पुणे - गेल्या काही दिवसांपासून खासदार गिरीश बापट हे पुण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर आक्रमक झाले आहे. खासदर बापट यांनी थेट आयुक्तांच्या घरी जाऊन पाण्याचे प्रेशर चेक ( Girish Bapat Check Commissioner Home Water ) केले. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसने आता गिरीश बापट यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले आहे. 'अहो बापट बंद करा नाटक', असे म्हणत गिरीश बापट यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली ( NCP Agitation Against Girish Bapat ) आहे.
याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, गेली 5 वर्ष पुण्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. सत्ता असताना भाजपने पुण्याच्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भातील समान पाणी पुरवठा योजना आणली. पण, त्याचे काय झाले. 5 वर्ष झाल्यानंतर आत्ता खासदार गिरीश बापट यांना जाग आली आहे. एवढी वर्ष भाजपने आणि खासदार गिरीश बापट यांनी काय केला, असा जगताप यांनी खासदार बापट यांनी विचारला आहे.