पुणे - कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यावर तसेच विद्यार्थ्यांच्या परीक्षांवर टांगती तलवार आहे. सद्यपरिस्थितीत सरकारने ऑनलाइन शिक्षण पद्धतीची अंमलबजावणी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी पालिका प्रशासनाने ऑनलाइन शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. याबाबत अधिक माहिती अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली आहे.
पुणे महापालिका शाळांमध्ये 'ऑनलाइन एज्युकेशन'साठी चाचपणी सुरू - pune additional commissioner
सद्यपरिस्थितीत सरकारने ऑनलाइन शिक्षण पद्धतीची अंमलबजावणी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी पालिका प्रशासनाने ऑनलाइन शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे.
![पुणे महापालिका शाळांमध्ये 'ऑनलाइन एज्युकेशन'साठी चाचपणी सुरू PMC schools](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7574336-thumbnail-3x2-pune.jpg)
महापालिकेच्या शाळेत गरीब, मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलं शिकायला येतात. सर्वाकडेच ऑनलाइन कनेक्टिव्हीटी असण्याची शाश्वती नाही. यामुळे सद्या केबल चालकांशी चर्चा सुरू असून त्याच्यांकडे उबलब्ध असणाऱ्या एका वाहिनीवर शैक्षणिक माहिती देण्याचा प्रयत्न आहे, असे अतिरिक्त आयुक्तांनी सांगितले.
तसेच पालिकेच्या डिजीटल क्लासरूम आणि स्टुडिओमध्ये तयार केलेला डिजीटल अभ्यासक्रम या वाहिनीवर प्रसारित होणार आहे. पुणे विद्यापीठाच्या 'विद्यावाणी' या रेडिओ वाहिनीचा वापर करण्यावर देखील विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत विद्यापीठ प्रशासनासोबत चर्चा सुरू आल्याचे अग्रवाल म्हणाल्या.