पुणे - पुणे महापालिकेने वेगाने टेस्ट करून कोरोनाचे रूग्ण शोधण्यासाठी रॅपिड अँटीजेन टेस्टिंग किट वापरायचे ठरवले आहे. आयसीएमआरने मान्यता दिलेले १ लाख ॲंटीजेन किट पुणे महापालिकेने खरेदी केले आहे. हे किट महापालिकेकडे पोहोचले असून शहरात अत्यंत वेगाने झोपडपट्टीत रॅपिड टेस्टिंग करता येणे आत्ता शक्य झाले आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांमनी दिली.
अर्ध्या तासात कळणार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, पुणे महापालिका वापरणार रॅपिड अँटीजेन टेस्टिंग किट - पुणे महापालिका कोरोना लेटेस्ट बातमी
या टेस्टच्या मदतीने या अडचणींवर मात करणे शक्य होणार आहे. दोनच मिनीटात ही चाचणी करणं शक्य आहे. आज पासून ही तपासणी करण्यास सुरवात करण्यात येणार आहे. या संबंधी महापालिकेच्या डॉक्टर आणि स्टाफ यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
![अर्ध्या तासात कळणार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, पुणे महापालिका वापरणार रॅपिड अँटीजेन टेस्टिंग किट antigen testing kit](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7843036-553-7843036-1593583755750.jpg)
सद्यस्थितीत चाचणी आणि रिपोर्ट येण्यासाठी २४ तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ लागतो. यामुळे या काळात गर्भवती महिला आणि गंभीर रुग्णांवर उपचार करणे अवघड होत होते. या टेस्टच्या मदतीने या अडचणींवर मात करणे शक्य होणार आहे. दोनच मिनीटात ही चाचणी करणं शक्य आहे. आज पासून ही तपासणी करण्यास सुरवात करण्यात येणार आहे. या संबंधी महापालिकेच्या डॉक्टर आणि स्टाफ यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कंटेन्मेंट झोन, हॉटस्पॉट भागात या किटचा वापर करण्यात येणार आहे. केवळ अर्ध्या तासात रुग्ण सापडल्याने महापालिकेचे ताण कमी होणार आहे.
कोरोना रुग्णांना तातडीने उपचार करणे सोपे होणार आहे. यापुढे ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिलांची घरीच टेस्ट करण्यात येणार आहे. कोरोनाचे निदान लवकर व्हावं यासाठी महापालिकेने 1 लाख अँटीजेन टेस्टिंग किट खरेदी केले आहे. खासगी रुग्णालयांनी देखील जे रुग्ण इतर आजारासाठी रुग्णालयात येत आहे त्यांच्यासाठी हे किट वापरावे, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.