पुणे - पुण्यातील वडगाव शेरी येथे अतिक्रमण विभागाच्या कारवाई दरम्यान एक अजब प्रकार समोर आला आहे. कारवाईच्या दरम्यान भाजी विक्रेता फेरीवाला थेट अतिक्रमणाच्या गाडीखाली झोपला आणि मला माझी गाडी वापस द्या, अशी विनंती करू लागला. वडगाव शेरीमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. याच्याविरोधात पुणे महापालिकेने कारवाईचा बडगा उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याच दरम्यान या भागतील अनधिकृत फेरीवाल्यांवर महापालिकेचे काही अधिकारी कारवाई करत होते. या कारवाई दरम्यान विभागाने या भाजी विक्रेत्याची गाडी उचलली आणि टेम्पोत टाकली.
पुणे महापालिकेच्या अतिक्रमण कारवाई दरम्यान संताप अनावर, भाजी विक्रेता थेट टेम्पोखाली झोपला - Unauthorized peddlers
अतिक्रमण विरोधी पथक कारवाई करत असल्याने फेरीवाल्याला संताप झाला. अगोदर तो माझी गाडी सोडा असे म्हणत त्या भाजीवाला विक्रेत्याची अधिकाऱ्यांसमोर विनवणी करू लागला. मात्र संबंधित अधिकारी ऐकत नाही म्हटल्यावर तो थेट गाडीखाली जाऊन झोपला आणि माझी गाडी द्या, अशी विनवणी करू लागला. फेरीवाल्याच्या तो व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल होताना पाहायला मिळत आहे.
भाजी विक्रेता थेट टेम्पोखाली झोपला

Last Updated : Feb 15, 2022, 12:29 PM IST