पुणे -केंद्र सरकारच्या निर्देशानुसार पुणे महापालिका हद्दीतील 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी ( Pune 15 to 18 Age Group Vaccination ) कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे. याकरिता महापालिकेच्यावतीने ( PMC planning for Children Vaccination ) नियोजन करण्यात आले असून पात्र लाभार्थ्यांची संख्या, एकाच वेळी होणारी गर्दी आणि ओमायक्रोन विषाणूच्या संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षता घेता लसीकरण केंद्रांची ( Vaccination Center Increased In Pune ) संख्या ५ वरून ४० पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. लसीकरण वेळेत, वेगाने आणि सुकर करण्याचा आपला प्रयत्न आहे. त्याला निश्चितच यश येईल, हा विश्वास वाटतो, अशी प्रतिक्रिया पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
शहरात पहिल्या टप्प्यात 40 स्वतंत्र लसीकरण केंद्रे -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी कोरोना लसीकरण सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आज पुणे महापालिकेचे नियोजन पूर्ण झाले आहे. नवीन लाभार्थी वयोगटासाठी कोवॅक्सिन लस देण्याचे निर्देश देण्यात आले असून त्या दृष्टीने लशीचा मुबलक साठा उपलब्ध करण्यात येत आहे. शहरातील सर्व भागातील लाभार्थ्यांना लस घेता यावी, यासाठी शहरात पहिल्या टप्प्यात 40 स्वतंत्र लसीकरण केंद्रे सुरू करण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे.