पुणे - महानगरपालिका निवडणुका जवळ येत आहेत. तशी-तशी राजकीय पक्षातली चढाओढ देखील दिसत आहे. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात नगरसेवक घेणे, अरोप प्रत्यारोप, दवे प्रतिदावे हे मोठ्या प्रमाणत सुरू आहेत. (Pune Municipal Corporation election) त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तर भाजपचे १६ नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले आहे. (list of aspirants NCP For PMC Election 2022) त्याचबरोबर पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
६ दिवसांत इच्छुकांनी यादी द्यावी
येणाऱ्या निवडणुकिसाठी राष्ट्रवादीने आता इच्छुकांची यादी मागवली आहे. महापालिका निवडुकीसाठी इच्छुकांची यादी येत्या ६ दिवसांत सादर करा असे आदेश अजित पवार यांनी दिले असल्याची माहिती मिळत आहे. पुण्यातील ८ विधानसभा मतदार संघातील निरीक्षक या याद्या गोळा करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली आहे.