पुणे - जिल्ह्यात 13 जुलै ते 23 जुलै दरम्यान लॉकडाऊन असेल, अशी माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे. दिनांक 13 तारखेला मध्यरात्रीपासून पुणे, पिंपरी चिंचवड आणि त्यांना लागून असलेल्या गावांमध्ये लॉकडाऊन लागू होईल. पुणे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयांच्या हद्दीतील भाग, पुणे कॅन्टोनमेंट आणि हवेली तालुक्यातील गावांचा यात समावेश होतो. हा लॉकडाऊन 10 दिवसांसाठी म्हणजे 23 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत असेल, असे आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.
दहा दिवसांचा हा लॉकडाऊन पाच-पाच दिवसांच्या दोन टप्प्यांत असेल. पहिल्या पाच दिवसांमधे फक्त दूध, औषधे आणि वृत्तपत्रे सुरू राहतील. इतर सर्व गोष्टी बंद राहतील. नागरिकांनी या काळात लागणाऱ्या गोष्टी दोन दिवसांमधे खरेदी कराव्यात. त्यानंतर पाच दिवसांच्या दुसऱ्या टप्प्यात लोकांना त्यांना हव्या असलेल्या गोष्टीं सकाळी दहा ते संध्याकाळी चार या कालावधीत खरेदी करता येतील.
हेही वाचा -'सारथी'बाबतचे आश्वासन अजित पवार पूर्ण करतील असा विश्वास - राजेंद्र कोंढरे