पुणे -जगातील काही देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा फैलाव (Corona Spread) वाढत आहे. काही देशांमध्ये तर पुन्हा लॉकडाऊन देखील लावण्यात आले आहे. कोरोनाची चौथी लाट (Corona Fourth Wave) येऊ शकते अशी भीती आहे. त्यामुळे पुणे महापालिकेने (PMC) देखील याची खबरदारी घेतली आहे. ज्या नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला नाही, अशा नागरिकांनी लवकरात लवकर दुसरा डोस घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar) यांनी केले आहे.
विक्रम कुमार - आयुक्त, पुणे मनपा तसेच इतर सुविधांचीही तयारी देखील महापालिकेच्या माध्यमातून सुरू आहे. ऑक्सिजन प्लँट, बेड यावर लक्ष ठेवून आहे. गरज लागल्यास लगेच वापरात देखील आणू, असे देखील यावेळी आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
नागरिकांनी दुसरा डोस घ्यावा -
शहरात लसीकरण मोहीम जरी जोरात सुरू असली तरी आजमितीला शहरात दीड लाखाहून अधिक नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला नाहीये.अश्या नागरिकांना मॅसेजेस करण्यात येत आहे.तसेच महापालिकेच्या माध्यमातून लसीकरणासाठी जनजागृती देखील करण्यात येत आहे.ज्यांनी दुसरा डोस घेतला नाहीये अश्या नागरिकांनी लवकरात लवकर डोस घ्यावं असं आवाहन यावेळी आयुक्त विक्रम कुमार यांनी केलं आहे.
लसीकरणासाठी जनजागृती -
शहरात लसीकरण जोरात सुरू आहे. तरी आजमितीला शहरात दीड लाखाहून अधिक नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला नाही. अशा नागरिकांना मेसेज करण्यात येत आहेत. तसेच महापालिकेच्या माध्यमातून लसीकरणासाठी जनजागृती देखील करण्यात येत आहे. ज्यांनी दुसरा डोस घेतला नाही अशा नागरिकांनी लवकरात लवकर डोस घ्यावा, असे आवाहन यावेळी आयुक्त विक्रम कुमार यांनी केले आहे.
पुणे महापालिकेत मागील आठवड्यापासून प्रशासक म्हणून महापालिका आयुक्त यांची नेमणूक करण्यात आली आहे. महापालिकेत जे विषय पेंडिंग आहेत किंवा जे विषय नवीन आहेत असे सर्व विषय मार्गी लावण्यासाठी धोरण तयार करण्यात आले आहे. लवकरात लवकर विषय कशा पद्धतीने मार्गी लावण्यात येतील यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच 1 एप्रिलपासून नवीन वर्ष सुरू होत आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी जे बजेट सादर केले होते त्याची अंमलबजावणी देखील एक एप्रिलपासून करण्यात येणार आहे. तसेच नव्याने महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या 23 गावांबाबत सोयी-सुविधा या नवीन वर्षात सुरू होणार आहेत, असे देखील यावेळी विक्रम कुमार यांनी सांगितले.
एअर कॉलिटी इम्पृमेंट प्रोग्रॅम हा केंद्र सरकारचा कार्यक्रम आहे. त्यात पुणे महापालिकेला मोठ्या प्रमाणात ग्रँट मिळत आहे. या माध्यमातून सुरुवातीला 200 मिनी बसेस या खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तेही इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रदूषण होणार नाही. याचा फायदा छोट्या रस्त्यांवर देखील होणार आहे, असे देखील यावेळी विक्रम कुमार यांनी सांगितले.