पुणे - कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका कात्रज दूध डेअरीला बसला आहे. या डेअरीत पुणे जिल्हा व इतर ठिकाणाहून दूध संकलन होत असते. मात्र दूध वितरणावर ५० टक्के तर दुग्धजन्य पदार्थ बनवण्याचे प्रमाण घटल्याने ६० टक्के परिणाम झाला आहे. कात्रज डेअरीत रोज एक लाख ८० हजार लिटर दूधाचे संकलन होते. यामधून लॉकडाऊनच्या आधी १ लाख ३५ हजार लिटर दूध वितरीत होत होते. मात्र आता लॉकडाऊनमुळे हे वितरण ८० हजार लिटरवर आले आहे.
दुग्धव्यवसायाला मोठा फटका, दूध वितरणात 50 टक्के घट - pune milk production news
कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका कात्रज दूध डेअरीला बसला आहे. या डेअरीत पुणे जिल्हा व इतर ठिकाणाहून दूध संकलन होत असते. मात्र दूध वितरणावर ५० टक्के तर दुग्धजन्य पदार्थ बनवण्याचे प्रमाण घटल्याने ६० टक्के परिणाम झाला आहे.
![दुग्धव्यवसायाला मोठा फटका, दूध वितरणात 50 टक्के घट milk production in pune](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6610012-817-6610012-1585656908833.jpg)
कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका कात्रज दूध डेअरीला बसला आहे.
लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व वस्तूंची विक्री बंद आहे. मात्र कोरोनाच्या भीतीने अनेक लोक शहर सोडून गावाकडे निघून गेले आहेत. यामुळे दूधाची विक्री देखील कमी झाली आहे. तसेच चहाचे हॉटेलही बंद आहेत. त्यामुळेही दूध वितरित होत नाही. यामुळे कमी दराने दूध वितरित केले जात आहे.