महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुणे मेट्रोमध्ये 'बायोडायजेस्टर'चा वापर; डीआरडीईबरोबर करार - Indian defense technology use in metro

पुणे मेट्रोमध्ये वनाझ ते रामवाडी आणि पीसीएमसी ते स्वारगेट या 2 मार्गिकेमध्ये 31 स्थानके असणार आहेत. पुणे मेट्रोच्या स्थानकांमध्ये प्रवाशांसाठी लिफ्ट, एस्केलेटर, पिण्याचे पाणी, इन्फॉर्मेशन डिस्प्ले व प्रसाधन सुविधा उपलब्ध असणार आहेत.

डॉ. डी. के. दुबे व  डॉ. ब्रिजेश दीक्षित
डॉ. डी. के. दुबे व डॉ. ब्रिजेश दीक्षित

By

Published : Jan 5, 2021, 3:33 PM IST

Updated : Jan 5, 2021, 4:24 PM IST

पुणे - पुणे मेट्रोचे काम प्रगती पथावर असून ४७ टक्के काम पूर्ण झाले आहे. पुणे मेट्रोच्या स्थानकांमध्ये प्रसाधन सुविधांसाठी, पाणी संवर्धन करण्यासाठी बायोडायजेस्टर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी पुणे मेट्रो आणि डीआरडीई, डीआरडीओ यांच्यामध्ये संयुक्तिक करार करण्यात आला आहे.

पुणे मेट्रोमध्ये वनाझ ते रामवाडी आणि पीसीएमसी ते ते स्वारगेट या 2 मार्गिकेमध्ये 31 स्थानके असणार आहेत. पुणे मेट्रोच्या स्थानकांमध्ये प्रवाशांसाठी लिफ्ट, एस्केलेटर, पिण्याचे पाणी, इन्फॉर्मेशन डिस्प्ले व प्रसाधन सुविधा उपलब्ध असणार आहेत.

पुणे मेट्रोची स्थानके आय. जी. बी. सी. (IGBC) ग्रीन बिल्डिंगच्या मार्गदर्शक तत्वाद्वारे बनविण्यात येत आहेत. अनेक पर्यावरण संवर्धन तंत्रज्ञानाचा स्टेशन उभारणीत समावेश करण्यात आला आहे. पुणे मेट्रोच्या स्थानकांमध्ये प्रसाधन सुविधांसाठी, पाणी संवर्धन करण्यासाठी बायोडायजेस्टर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. पुणे मेट्रो आणि डीआरडीई, डीआरडीओ यांच्यामध्ये संयुक्तिक करार झाल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी दिली.

पुणे मेट्रोमध्ये 'बायोडायजेस्टर'चा वापर


तंत्रज्ञानाचा रेल्वेसह संरक्षणातही वापर-
डीआरडीई, डीआरडीओ या संस्थांने बायोडायजेस्टर तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्याचा मोठ्या प्रमाणात सैन्यदल व रेल्वेमध्ये वापर होत आहे. बायोडायजेस्टर तंत्रज्ञान वापरण्यास अत्यंत सुलभ आहे. या तंत्रज्ञानामुळे कमीत कमी देखभालीची गरज पडते. या तंत्रज्ञानाचा वापर नागपूर मेट्रोमध्ये करण्यात आल्याचे डीआरडीईचे संचालक डॉ. डी. के. दुबे यांनी सांगितले. याच तंत्रज्ञानाचा वापर पुणे मेट्रो स्थानके व इतर ठिकाणी करण्यात येणार आहे. त्यासंबंधीचा तंत्रज्ञान विषयी करार पुण्यामध्ये करण्यात आला.

करारावर अतुल गाडगीळ (संचालक, प्रकल्प) आणि डॉ. डी. के. दुबे (संचालक, डीआरडीई) यांच्यामध्ये करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. करारासंबंधीचे दस्तऐवज डॉ. ब्रिजेश दीक्षित (व्यवस्थापकीय संचालक महामेट्रो) व डॉ. एच. के. सिंग (डायरेक्टर जनरल डीआरडीओ) यांच्यामध्ये देवाण घेवाण करण्यात आली.

मेट्रोला पर्यावरणपूरक बांधिलकी जपण्यास होणार मदत

बायोडायजेस्टर तंत्रज्ञानसंबंधी करारामुळे पुणे मेट्रोला पर्यावरण पूरक बांधिलकी जपण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे. पुणे मेट्रो नेहमीच पर्यावरण संवर्धनाची भूमिका घेत आल्याचे पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले. झाडांचे पुनर्रोपण, सौर विद्युत पॅनलचा वापर, मेट्रो स्थानकांमध्ये कमीत कमी विजेचा वापर, बायोडायजेस्टर इत्यादी पर्यावरण पूरक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर मेट्रो उभारणीत करण्यात येत आहे. यावेळी पुणे मेट्रो एक आदर्श पर्यावरण पूरक मेट्रोमध्ये भविष्यात नावारूपाला येईल, असा विश्वास दीक्षित यांनी व्यक्त केला.

Last Updated : Jan 5, 2021, 4:24 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details