महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

VIDEO - पुणे मेट्रोची प्रतिक्षा अंतिम टप्पात; पाहा ड्रोननं टिपलेली मेट्रोची दृष्यं - पिंपरी ते रेंज हिल

पुणेकरांना असलेली मेट्रोची प्रतिक्षा लवकरच पुर्ण होणार आहे. मेट्रोचे काम वेगात सुरू असून लवकरच मेट्रो धावणार आहे. मेट्रो धावेल त्या मार्गाची दृष्य ड्रोन कॅमेऱ्यात टिपण्यात आली आहेत.

पुणे मेट्रो
पुणे मेट्रो

By

Published : Feb 12, 2020, 1:38 PM IST

पुणे - मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल या प्रस्तावित मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. मेट्रोचे पुल, काम सुरू असल्याने विविध ठिकाणी वळवण्यात आलेली वाहतूक सेवा, मेट्रो धावेल तो मार्ग हि सर्व दृष्य ड्रोन कॅमेऱ्यात टिपण्यात आली आहेत.

ड्रोननं टिपलेली मेट्रोची दृष्यं


महामेट्रो अंतर्गत पुणे पिंपरी-चिंचवड मेट्रोचे कॉरिडॉर -1 काम (पिंपरी ते रेंज हिल) वेगात सुरू आहे. या कामामधील संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशनच्या प्रवेश आणि निगमन - 2 साठी फूट ओव्हर ब्रिजचे देखील काम सुरू आहे. यासंदर्भात वल्लभनगर बीआरटी बसस्थानक पुण्याच्या दिशेने पाच मीटर हलविण्याचे कामही सुरू झाले आहे. हे काम ३० दिवसांपर्यंत चालणार आहे. त्यामुळे या कालावधीत वल्लभनगर बीआरटी बस स्थानक बंद राहणार आहे. दरम्यान, मेट्रोच्या या कामाचा ड्रोन व्हिडीओ नुकताच समोर आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details