पुणे -राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयसीएमआरने 10 जानेवारीला होम टेस्ट किट किंवा सेल्फ टेस्ट करण्याची परवानगी दिली. या टेस्ट किटमध्ये होम टेस्ट किट वापरून रॅपिड अॅन्टीजेन टेस्ट रिपोर्ट फक्त 15 ते 20 मिनिटांत येतो. त्यामुळे अनेकांनी कोरोना चाचणीसाठी होम किट्सचा वापर केल्यानंतर त्याचे रिपोरटिंग करायचे असते. राज्यात विविध शहरात हे किट मोठ्या प्रमाणात विकल्या गेल्या आणि मोठ्या प्रमाणात नागरिकांनी त्याचा वापर ही केला. पण फक्त 20 ते 30 टक्केच नागरिकांनी याचे रिपोरटिंग केले. त्यामुळे अनेक पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद ही झालेली नाहीये. त्यामुळे कोरोनाच्या आकडेवारीत मोठी गफलत होऊ लागली आहे. अशातच आता पुणे महापालिका एफडीएच्या मदतीने या टेस्ट किट घेणाऱ्या नागरिकांवर नजर ठेवणार आहे. टेस्ट किट घेऊन जाणाऱ्या नागरिकांची नोंद केली जाणार असून त्यानंतर त्यांना संपर्क देखील केलं जाणार आहे. अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ( murlidhar mohol on home test kit ) दिली.
हजारो रुग्णांना ट्रॅक करणे शक्य होत नाहीये -
सध्या मोठ्या प्रमाणात शहरात लोक घरीच कोरोना चाचणीसाठी उपलब्ध किट्सचा वापर करून टेस्ट करत आहेत. मात्र, रिपोर्टची माहिती प्रशासनाला दिली जात नाही. ज्यामुळे कोरोनाची लागण झालेल्या हजारो रुग्णांना ट्रॅक करणे शक्य होत नाहीये. कोरोना चाचणीची माहिती न दिल्यामुळे, पॉझिटिव्ह रुग्णांच्या माध्यमातून संसर्ग इतरांमध्ये पसरू शकतो. त्यामुळे होम टेस्ट किट वापराबाबत आढावा बैठकीत प्रशासनाच्या समोर हा मुद्दा मांडण्यात आला आहे.आणि आत्ता सर्व मेडिकल दुकानदारांना याबाबत एफडीएच्या माध्यमातून मॉनेटरिंग केली जाणार आहे.आणि आत्ता नोंद करूनच नागरिकांना टेस्ट किट दिलं जाणार आहे.आणि त्याची नोंदणी करून त्या नागरिकाला संपर्क देखील केलं जाणार आहे.असं देखील यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं.