महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

International Marathon 2022 : पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनला मध्यरात्रीपासून सुरूवात;प्रथमच रात्री होतेय स्पर्धा - Pune International Marathon starts from midnight

३५ व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनला आज रात्री बारा वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. पुण्याच्या क्रीडा विश्वात मानबिंदू ठरलेल्या आणि पुण्याला जागतिक क्रीडा नकाशावर नेणाऱ्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनला दरवर्षी उत्साही पुणेकरांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये. (Pune International Marathon starts) असा विचार केल्याने देशात पहिल्यांदाच ही रात्रीची आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे.

पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनला मध्यरात्रीपासून सुरूवात;प्रथमच रात्री होतेय स्पर्धा
पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनला मध्यरात्रीपासून सुरूवात;प्रथमच रात्री होतेय स्पर्धा

By

Published : Feb 27, 2022, 10:38 AM IST

पुणे - पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेला आज रात्री बारा वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. ही स्पर्धा ३५ वी आहे. देशात प्रथमच अशा पद्धतीने रात्रीची मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ( International Marathon starts 2022) दरवर्षी होणारी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा या वेळी रात्री घेण्यामागे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव हे कार आहे.

व्हिडिओ

पुण्याच्या मॅरेथॉनला देश-विदेशातून मॅरेथॉन पटू येत असतात

पुण्याच्या क्रीडा विश्वात मानबिंदू ठरलेल्या आणि पुण्याला जागतिक क्रीडा नकाशावर नेणाऱ्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनला दरवर्षी उत्साही पुणेकरांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये. असा विचार केल्याने देशात पहिल्यांदाच ही रात्रीची आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे. एवढेच नाही तर पुण्याच्या मॅरेथॉनला देश-विदेशातून मॅरेथॉन पटू येत असतात. यावर्षी देखील पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये परदेशातील ३० धावपाटू व देशातील २५०० धावपटू सहभागी झाले आहेत.

असा असणार आहे पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचा मार्ग

३५ वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा रात्री १२ वाजून ०१ मिनिटांनी सारसबागेजवळील सणस ग्राऊंड येथून सुरू हाईल. सणस ग्राउंड-बाजीराव रस्सा-शनिपार-अप्पा बळवंत चौक- शनिवार वाडा नवा पुल- रामसर बेकरी चौकातून परत याच मार्गानि वळून बाजीराव रोड-सणस ग्राऊड, सिंहगड रस्ता दांडेकर चौक- गणेशमळा- संतोष हॉल- गोयल गंगा चौक-लोकमत भवन व तेथुन परत सणस ग्राऊंड ही पहिली २१ कि. मी. ची फेरी होईल व पुन्हा त्याच मार्गाने २१ कि.मी. ची दुसरी फेरी पूर्ण करून सर्व धावपटू स्पर्धक सणस ग्राऊंड येथे स्पर्धा पूर्ण करतील.

पुरूष व महिला स्पर्धा सणस मैदान येथुन सुटेल

पुरुष व महिलांसाठीची अर्ध-मरेथॉन (२१ कि.मी.) ही देखील वर त्याच मार्गाने पहिली फेरी पूर्ण करून सणस ग्राऊंड येथे संपणार आहे. यानंतर २७ फेब्रुवारी रोजी पहाटे ५.३० या १० कि.मी. पुरूष व महिला स्पर्धा सणस मैदान येथुन सुटेल ती महालक्ष्मी चौक (सारस बाग)-दांडेकर चौक-गणेशमळा-संतोष हॉल वरून परत त्याच मार्गे सणस ग्राऊंड येथे संपेल. तर, व्हीलचेअरची ३ कि. मी ची शर्यत सकाळी ६.१५ वाजता सणस मैदान महालक्ष्मी चौक (सारस बाग)-सिंहगड रस्ता-दांडेकर चौकातुन परत सणस ग्राऊंड येथे संपेल. असे देखील यावेळी छाजेड म्हणाले. दरम्यान आज ठीक १२ .०१ मिनिटांनी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी ध्वज फडकवत या स्पर्धेला सुरूवात केली आहे.

हेही वाचा -Rokhathok on Marathi : भाजपचा विचार व्यापारी प्रवृत्तीचा! मराठीचा अभिमान त्यांना नाही;रोखठोक'मधून बाण

ABOUT THE AUTHOR

...view details