पुणे -श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या 319 व्या जयंतीनिमित्त बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीने पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डॉ. राजगोपाल चिदंबरम यांना थोरले बाजीराव पेशवे शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, गिरीष बापट, एअर मार्शल भूषण गोखले, उदयसिंहजी पेशवे उपस्थित होते.
अनु शास्त्रज्ञ डॉ. राजगोपाल चिदंबरम यांना 'थोरले बाजीराव पेशवे शौर्य पुरस्कार' प्रदान
श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या 319 व्या जयंतीनिमित्त बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीने पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डॉ. राजगोपाल चिदंबरम यांना थोरले बाजीराव पेशवे शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अनु शास्त्रज्ञ डॉ राजगोपाल चिदंबरम यांना "थोरले बाजीराव पेशवे शौर्य पुरस्कार"
भारताने आण्विक तंत्रज्ञान स्वबळावर विकसित केले - डॉ. राजगोपाल चिदंबरम
अनेक देशांनी परस्परांच्या मदतीने आण्विक तंत्रज्ञानाचा विकास केला आहे. मात्र, भारताने स्वतःच्या बळावर आण्विक तंत्रज्ञान विकसित केले आहे, असे मत भारतीय अनु शास्त्रज्ञ आर. चिदंबरम यांनी व्यक्त केले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी नुकतेच अणुबॉम्बच्या वापरासंदर्भात पाकिस्तानला इशारा दिला होता. त्यामुळे आर. चिदंबरम यांचे विधान महत्त्वाचे मानण्यात येत आहे.