पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना आज रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांसाठी वीजेवरील दिवे बंद करून मेणबत्ती, दिवे, मोबाईलचे फ्लॅश किंवा टॉर्च लावण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधांनाच्या या आवाहनाला पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. पुण्यातील सानेगुरुजी मंडळातर्फे आंबील ओढा कॉलनी येथे मेणबत्ती आणि दिवे लावत पंतप्रधानांच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद दिला.
पंतप्रधानांच्या आवाहनाला पुणेकरांची साथ; नागरिकांनी घरोघरी लावले दिवे - switch of all the lights of houses today
रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटे घरातील लाइट्स बंद करून दिवे लावावे किंवा मोबाइल फ्लॅश लाईट सुरू करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी संपूर्ण देशाला केले होते. त्यांच्या या आवाहनाला रविवारी रात्री ९ वाजता पुणेकरांनी उत्तम प्रतिसाद दिला.
पंतप्रधानांच्या आवाहनाला पुणेकरांची साथ
हेही वाचा...ऐतिहासिक अमृतांजन पुलावर पडला पहिला हातोडा !
'कोरोनाचा सर्वाधिक फटका आपल्या गरीब जनतेला बसला आहे. त्यांना या अंधःकारामधून बाहेर कढण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. त्यासाठीच तुम्हा सर्वांकडून मला या रविवारी म्हणजेच ५ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता तुमची नऊ मिनिटे हवी आहेत' असे आवाहन नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात केले होते. त्यांच्या या आवाहनाला आज देशवासीयांना उत्तम प्रतिसाद दिला.
Last Updated : Apr 5, 2020, 9:51 PM IST