पुणे - जिल्ह्यातील सर्वात मोठा फुलबाजार असलेला पुण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील फुलबाजार आजपासून सुरू करण्यात आला आहे. कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टनसिंगचे पालन करून येथील व्यवहार सुरू राहणार आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे येथील सर्व व्यवहार बंद होते. अनलॉक सुरू करण्यात आल्यानंतर पुण्यातील भाजीपाला आणि फळबाजार सुरू करण्यात आला होता. परंतु फुलबाजार सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी दिली नव्हती. परंतु आजपासून हा बाजार पुन्हा एकदा सुरू करण्यात आला आहे.
Pune Unlock : पुण्यातील फुलबाजार आजपासून सुरू - pune flower market open
पुण्यातील गुलटेकडी येथील फुलबाजार आजपासून सुरू करण्यात आला आहे. या फुलबाजारातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होते. पहाटेपासून गजबजणारा हा फुलबाजार पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा फुलबाजार आहे. घाऊक आणि किरकोळ व्यापारी याठिकाणी मोठी गर्दी करतात.
बाजारातील गर्दी टाळण्यासाठी नियम व अटी घालून देण्यात आले आहेत. प्रवेशद्वारावर येणाऱ्या प्रत्येकाचे तापमान थर्मल गनद्वारे नोंदवले जात आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी 50 टक्के दुकाने एका दिवशी तर 50 टक्के दुकाने दुसऱ्या दिवशी उघडतील. त्यानुसार आज सकाळपासून हा बाजार गजबजलेला पाहावयास मिळाला.
पुण्यातील गुलटेकडी येथे असलेल्या या फुलबाजारातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होते. पहाटेपासून गजबजणारा हा फुलबाजार पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा फुलबाजार आहे. घाऊक आणि किरकोळ व्यापारी याठिकाणी मोठी गर्दी करतात. याशिवाय पुणे शहराच्या आसपासचे शेतकरीही जागा मिळेल तिथे ठाण मांडून फुलांची विक्री करतात. ग्राहक आणि खरेदीदार एकत्र येत असल्यामुळे या बाजारात मोठी गर्दी असते. त्यामुळे कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर 19 मार्चपासून हा बाजार बंद करण्यात आला होता.