महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Pune Farmers : पुणे जिल्ह्यातला शेतकरी झाला आधुनिक, पिकांवरील फवारणीसाठी ड्रोनचा वापर - आधुनिक शेती

Pune Farmers : पुणे जिल्ह्यातील राजुरी गावातील शेतकरी सोयाबीन पीकावर ( soybean crop ) ड्रोनच्या सहाय्याने फवारणी ( Drone spraying ) केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही आधुनिक शेती ( Modern agriculture ) करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.

Pune Farmers
Pune Farmers

By

Published : Jul 27, 2022, 11:55 AM IST

पुणे - शेतीत नवनवीन तंत्रज्ञान ( New technologies in agriculture ) आल्याने शेतकऱ्यांना ( Farmers ) याचा मोठा फायदा झाला आहे. जगभरातील विविध देशांमधून येणारे शेतीविषयक उपकरणे ( Agricultural equipment ) आणीं त्यांच्या प्रशिक्षण म्हणून राज्यातील शेतकरी हा आत्ता अत्याधुनिक यंत्राकडे वळू लागला आहे. याचाच एक भाग म्हणून जशी परदेशात पिकांना हवेतून फवारणी केली जाते. तशीच फवारणी पुणे जिल्ह्यातील राजुरी (Pune Farmers ) गावात ( Rajuri village ) सोयाबीन पीकावर ( soybean crop ) ड्रोनच्या सहाय्याने फवारणी ( Drone spraying ) करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही आधुनिक शेती ( Modern agriculture ) करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

Pune Farmers

ड्रोनद्वारे सोयाबीन पिकाला फवारणी -पुर्वी शेतकरी पारंपारिक पद्धतीने शेती करत असत. त्यात बैलांच्या सहाय्याने नांगरनी, पीक टाकने आदी काम हे बैलांच्या सहाय्याने करत असतं. त्यानंतर ट्रॅक्टर आले. त्यामुळे बैलांचे मशागतीचे काम कमी झाले. पण जस- जस आधुनिक उपकरणे शेतीत यायला लागली. तस- तस शेतकरी आत्ता आधुनिक यंत्राकडे वळू लागला आहे. जुन्नर तालुक्यातील राजुरी गावात पहिल्यांदाच ड्रोन मशिनद्वारे सोयाबीन पिकाला फवारणी करण्यात आली आहे.

कमी खर्चात पिकांना फवारणी -पंपाने फवारणी करताना एका एकरसाठी साधारण तेराशे रुपये इतका खर्च येतो आणि त्यात संपूर्ण दिवस ती फवारणी करण्यात जातो. मात्र, आधुनिक शेतीचा विचार करता ड्रोनने फवारणी करण्यासाठी एका एकरसाठी फक्त आठशे रुपये इतका खर्च येतो. त्यामुळे वेळ देखील वाचण्यास मदत होते. या ड्रोनद्वारे सोयाबिन, बाजरी, मूग, उडीद, गहु, हरभरा, तुर तसेच ऊस मका आणि सर्व प्रकारच्या पिकांना फवारणी करता येणार आहे.

हेही वाचा -Uday Samant : अनंत गितेंचीच भूमिका एकनाथ शिंदे पुढे घेऊन जाताहेत, मग गितेही गद्दार का? उदय सामंतांचा प्रश्न

हेही वाचा -Banyan Tree : १५० वर्ष जुन्या वडाच्या झाडाला मिळाले नवजीवन; मनपाच्या उद्यान विभागाद्वारे यशस्वी पुनर्रोपण

ABOUT THE AUTHOR

...view details