महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Elon Musk Pune Friend : पुणे तिथे काय उणे! पुण्यातील तरुणाची थेट इलॉन मस्कशी मैत्री - प्रणय पाटोळेची इलॉन मस्कशी मैत्री

जगातील सर्वात श्रीमंतर व्यक्ती म्हणजे इलॉन मस्क. मात्र, तुम्हाला सांगितले तर, इलॉन मस्कची पुण्यातील एका तरुणाशी मैत्री ( Pranay Pathole Twitter Frind Elon Musk ) आहे. अन् ते नियमित ते ट्विटर चर्चा देखील करतात.

pranay pathole elon musk
pranay pathole elon musk

By

Published : Apr 4, 2022, 4:02 PM IST

पुणे -जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे नाव घ्यायचे झाल तर लगेच आपल्याला आठवत ते आघाडीच्या टेस्ला कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क ( Tesla CEO Elon Musk ) या नावाची जादू सध्या जगभर पसरली आहे. प्रत्येक क्षेत्रात अन्यसाधारण काम करून दाखवत इलॉन मस्क यांनी जगात आपल नाव केले आहे.

इलॉन मस्क मस्क हे ट्विटर वर अॅक्टिव्ह असल्याने ते कायम चर्चेत असतात. कारण अनेकदा त्यांचे एक ट्विट हे पुर्ण मार्केटवर परिणाम करते. एवढेच नाही तर मस्क हे अनेकांना ट्विटवर रिप्लाय देखील देतात. पुण्यात देखील एका तरुणाची थेट इलॉन मस्कशी मैत्री झाली आहे. ऐकून जरी नवल वाटत असेल पण हे खरं आहे.

प्रणय पाटोळे संवाद साधताना

पुण्यात राहणारा एक इंजिनीयर तरुणाची इलॉन मस्कशी मैत्री झाली आहे. प्रणय पाटोळे असे या तरुणाचे नाव ( Pranay Pathole Twitter Frind Elon Musk ) आहे. प्रणय हा मस्कशी नियमीत ट्विटर गप्पा देखील मारतात. हे वाचून विश्वास बसणार नाही. मात्र, सुरुवातीला जेव्हा पहिल्यांदा या तरुणाच्या ट्विटला मस्क यांचा रिप्लाय आला तेव्हा या तरुणाला देखील मोठा धक्का बसला होता. प्रणय सध्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करतो.

अशी झाली दोघांची मैत्री -प्रणयने सुरुवातीला आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक ट्विट केले होते. त्या ट्विटला मस्क यांनी रिप्लाय दिला. अन् इथूनच त्यांच्या मैत्रीला सुरुवात झाली. यावर प्रणय म्हणतो की, इलॉन मस्क यांनी जेव्हा पहिल्यांदा माझ्या ट्विटला रिप्लाय दिला तेव्हा, माझाही माझ्यावर विश्वास बसत नव्हता. मात्र, ही सत्य घटना होती. पुढे काही काळ आमची ट्विटरवर कधीकधी चर्चा करत होतो. मस्क मला मार्गदर्शन करत होते. ही गोष्टी माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती. पण, त्यानंतर आमची मैत्री अधिक घट्ट होत गेली. आम्ही आता ट्विटरवर नियमित संवाद साधतो. त्याचबरोबर ते अतिशय विनम्र व्यक्ती आहेत, असं देखील प्रणयने सांगितले आहे.

हेही वाचा -Sanjay Raut On BMC : कितीही असंतुष्ट आत्मे एकत्र आले तरी मुंबई मनपा आम्ही जिंकू -राऊत

ABOUT THE AUTHOR

...view details