महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुणे विभागात, 3 हजार 442 रुग्ण बरे, एकूण संख्या 7 हजार 218 तर ॲक्टीव रुग्ण 3 हजार 435

पुणे विभागातील 3 हजार 442 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधितरुग्णांची संख्या 7 हजार 218 झाली आहे. तर अ‌ॅक्टीव रुग्ण 3 हजार 435 आहेत. तसेच 212 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

Dr. Dipak Maishkar
आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

By

Published : May 25, 2020, 8:40 PM IST

पुणे - पुणे विभागातील 3 हजार 442 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधितरुग्णांची संख्या 7 हजार 218 झाली आहे. तर अ‌ॅक्टीव रुग्ण 3 हजार 435 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकूण 341 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 212 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पुणे विभागातील एकूण रुग्णांपैकी पुणे जिल्हयात 5 हजार 899 बाधीत रुग्ण असून कोरोनाबाधित 2 हजार 998 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‌ॅक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 623 आहे. कोरोनाबाधित एकूण 278 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 207 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. 24 मे च्या बाधीत रुग्णांच्या तुलनेत आज पुणे विभागात एकूण 395 बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. त्यापैकी पुणे जिल्ह्यात 283, सातारा जिल्ह्यात 31, सोलापूर जिल्ह्यात 20, सांगली जिल्ह्यात 6 तर कोल्हापूर जिल्ह्यात 55 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्हयात 309 कोरोनाबाधीत रुग्ण असून 120 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‌ॅक्टीव रुग्ण संख्या 182 आहे. कोरोनाबाधित एकूण 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 590 कोरोनाबाधीत रुग्ण असून 265 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‌ॅक्टीव रुग्ण संख्या 273 आहे. कोरोनाबाधित एकूण 52 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हयात 79 कोरोनाबाधीत रुग्ण असून 46 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‌ॅक्टीव रुग्ण संख्या 31 आहे. कोरोना बाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हयात 341 कोरोनाबाधीत रुग्ण असून 13 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‌ॅक्टीव रुग्ण संख्या 326 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यत विभागामध्ये एकुण 72 हजार 855 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 64 हजार 607 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 8 हजार 288 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 57 हजार 280 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 7 हजार 218 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details