महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

#coronavirus : पुणे विभागात आतापर्यंत 1 हजार 23 कोरोनाबाधित रुग्ण बरे; विभागात तब्बल 3 हजार 242 पॉझिटिव्ह रुग्ण

पुणे विभागात आजपर्यंत एकुण 32 हजार 498 नागरिकांचे स्व‌ॅब नमूने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी 30 हजार 809 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 1 हजार 689 नमून्यांचा अहवाल प्रतिक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 27 हजार 508 नमून्यांचा अहवाल कोरोना निगेटीव्ह आला असून 3 हजार 242 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

corona updates
corona updates

By

Published : May 10, 2020, 8:37 PM IST

पुणे - विभागात आतपर्यंत 1 हजार 23 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3 हजार 242 वर पोहचली आहे. तसेच कोरोनाचे ॲक्टिव्वह रुग्ण (उपचार सुरू असलेले) संख्या 2 हजार 51 आहे. पुणे विभागात कोरोनाबाधित 168 रुग्णांचा आतपर्यंत मृत्यू झाला आहे. तसेच 104 रुग्णांची स्थिती गंभीर असून उर्वरीत रुग्ण निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पुणे विभागामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 830 कोरोनाबाधित रुग्ण असून 938 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोनाच्या अ‌‌क्टिव्ह रुग्णांची संख्या 1 हजार 741 आहे. तर आतापर्यंत एकूण 151 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 96 रुग्ण गंभीर असून उर्वरित रुग्ण निरीक्षणाखाली आहेत.

हेही वाचा...विलगीकरण कक्षात असलेल्या महिलेला पोलीस पाटलाने केली शरीरसुखाची मागणी

1. सातारा जिल्ह्यात 119 कोरोनाबाधित रुग्ण असून 20 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सध्या जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 97 आहे. तसेच एकूण 2 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

2. सोलापूर जिल्ह्यात 238 कोरोनाबाधित रुग्ण असून 29 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सध्या जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 196 आहे. तसेच एकूण 13 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

3. सांगली जिल्ह्यात 37 कोरोनाबाधित रुग्ण असून 27 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सध्या जिलह्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 9 आहे. तसेच 1 कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

4. कोल्हापूर जिल्ह्यात 18 कोरोनाबाधित रुग्ण असून 9 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सध्या जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 8 आहे. तसेच 1 कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

पुणे विभागात आजपर्यंत एकुण 32 हजार 498 नागरिकांचे स्व‌ॅब नमूने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी 30 हजार 809 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 1 हजार 689 नमून्यांचा अहवाल प्रतिक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 27 हजार 508 नमून्यांचा अहवाल कोरोना निगेटीव्ह आला असून 3 हजार 242 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

आजपर्यंत पुणे विभागामधील 90 लाख 80 हजार 526 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. त्याअंतर्गत 3 कोटी 92 लाख 20 हजार 147 नागरिकांची तपासणी केली गेली आहे. यापैकी 2 हजार 167 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details