पुणे - कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुणे विभागात 8 हजार 122 झाली असून 3 हजार 841 बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर ॲक्टीव्ह रुग्ण 3 हजार 904 आहेत. विभागात कोरोनाबाधित एकूण 377 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 200 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुणे विभागातील कोरोनाबाधितांची संख्या वाढतीच, एकूण 377 रुग्णांचा मृत्यू - पुणे कोरोना घडामोडी
26 मेच्या बाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 403 ने वाढ झाली आहे, यामध्ये पुणे जिल्ह्यात 301, सातारा जिल्ह्यात 59, सोलापूर जिल्ह्यात 32, सांगली जिल्ह्यात 6, कोल्हापूर जिल्ह्यात 5 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झाली आहे.
यापैकी पुणे जिल्ह्यातील 6 हजार 604 बाधित रुग्ण असून 3 हजार 355 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 2 हजार 954 आहे. कोरोनाबाधित एकूण 295 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 193 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. 26 मेच्या बाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 403 ने वाढ झाली आहे, यामध्ये पुणे जिल्ह्यात 301, सातारा जिल्ह्यात 59, सोलापूर जिल्ह्यात 32, सांगली जिल्ह्यात 6, कोल्हापूर जिल्ह्यात 5 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झाली आहे.
सातारा जिल्ह्यात 394 कोरोनाबाधित रुग्ण असून 122 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 259 आहे. कोरोनाबाधित एकूण 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयातील 653 कोरोनाबाधित रुग्ण असून 297 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 292 आहे. कोरोनाबाधित एकूण 64 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यात कोरोनाबाधित 88 रुग्ण असून 47 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 39 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात 383 कोरोनाबाधित रुग्ण असून 20 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 360 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकूण 77 हजार 117 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 72 हजार 747 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 4 हजार 370 नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 64 हजार 516 नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह असून 8 हजार 122 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.