पुणे : पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या घट होत ( Pune Corona Cases ) आहे. त्यामुळे सोमवार पासून जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालय पूर्ण वेळ सुरु राहणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिली ( Ajit Pawar On Pune School ) आहे. विधानभवन येथे कोरोना आढावा बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यापुर्वी, मागच्या आठवड्यापासून जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालय सुरू करण्यात आल्या होत्या. यात पहिली ते आठवी तील शाळा फक्त चार तास सुरू होती. तर नववी नंतर शाळा ही पूर्णवेळ सुरू करण्यात आली होती. याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, पुण्यातील कोरोना रुग्णांत घट झाली आहे. त्यामुळे सोमवार पासून जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालय पुर्णवेळ सुरु होतील.
दोन दिवस लसीकरण बंद
जिल्ह्यात 15 ते 18 वयोगटातील लसीकरणात ग्रामीण भागात परिस्थिती चांगली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात लसीकरण वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. पण या लहान मुलांच्या लसीकरणासाठी जेवढी लस उपलब्ध व्हायला पाहिजे तेवढी लस उपलब्ध नाहीये. लस नसल्याने आज आणि उद्या लहान मुलांच लसीकरण बंद असणार आहे. जास्तीत जास्त लस कशी उपलब्ध करता येईल यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे पवार यांनी सांगितले.