पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सगळे निकाल जाहीर झाले आहेत. जिल्हा बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व कायम
असल्याचे या निकालावरून सिध्द झाले आहे . संचालकपदाच्या निवडणुकीनंतर एकुण संख्याबळ.
राष्ट्रवादी काँग्रेस- 17
कॉंग्रेस- 2
भाजप- 2
एकुण - 21
13:38 January 04
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सगळे निकाल जाहीर झाले आहेत. जिल्हा बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व कायम
असल्याचे या निकालावरून सिध्द झाले आहे . संचालकपदाच्या निवडणुकीनंतर एकुण संख्याबळ.
राष्ट्रवादी काँग्रेस- 17
कॉंग्रेस- 2
भाजप- 2
एकुण - 21
21 पैकी 14 जागांवरील उमेदवार बिनविरोध निवडून आले होते.
12:17 January 04
ड प्रवर्गातून राष्ट्रवादीचे दिगंबर दुर्गाडे विजयी
ड प्रवर्गातून राष्ट्रवादीचे दिगंबर दुर्गाडे विजयी
दोन जागेचे निकाल येणे बाकी
11:38 January 04
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निकाल अपडेट
पुणे:पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक निवडणूकीचे निकाल आज लागत आहेत. सकाळी 9 वाजता अल्पबचत भवन येथे मोजणीला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत बँक पतसंस्थेच्या गट क आणि हवेलीमुळशी तालुक्यातील गट अ निकालाची मोठी उत्सुकता आहे. मतमोजणीसाठी 13 टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. 21 पैकी 14 जागा याआधीच बिनविरोध आलेल्या आहेत. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व कायम राहण्यार असल्याचा कल पहायला मिळत आहे. हवेली मधून राष्ट्रवादीचे विकास दांगट तर मुळशीमधून सुनील चांदेरे आणि शिरूर मधून आमदार अशोक पवार विजयी झाले आहेत. ७ जागांसाठी निवडणूक झाली असुन आतापर्यंत ४ निकाल हाती लागले आहेत त्यात ३ राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार विजयी तर भाजपने १ जागा जिंकली आहे.