पुणे -टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी पुणे सायबर पोलीसांनी ( Pune Cyber Police ) आणखीन एकाला अटक केली आहे. 2018 मध्ये झालेल्या परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी नाशिकमधून मुकुंदा सूर्यवंशी या आरोपीला अटक करण्यात ( TET and MHADA paper Scam ) आली आहे.
आरोपीचा हरकळ बंधुशी संबंध
पुणे सायबर पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मधून अटक केलेला या आरोपीने ऑक्टोबर 2018 मध्ये झालेल्या टीईटी परीक्षार्थीची यादी पेनड्रॅएव्हमध्ये दिली असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच बरोबर आरोपी मुकुंदा सुर्यवंशी याने परीक्षार्थीकडून रोख 80 लाख घेऊन एजंट संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ यांना दिले असल्याचेदेखील तपासात उघड झाले आहे.
हेही वाचा-TET Teacher Certificate : 2013 पासून नियुक्त झालेल्या 'या' शिक्षकांच्या टीईटी प्रमाणपत्राची पडताळणी
२०१८ मध्येदेखील परीक्षेत मोठा घोटाळा
नुकताच 2020 मध्ये टीईटी परीक्षेत मोठा घोटाळा समोर ( TET Exam Scam 2020 ) आला होता आणि आज अटक केलेल्या आरोपीने २०१८ मधील परीक्षेतदेखील असाच मोठा घोटाळा झाला असल्याचं सांगितले आहे. त्यामुळे आता 2018 मध्ये ही किती परीक्षार्थीनी पैसे देऊन पास झाले ( TET Exam scam 2018 ) याचा तपास पोलीस करणार आहेत, अशी माहिती सायबर पोलीसांनी दिली आहे.