पुणे - पुण्यात दहशत माजवण्यसाठी गुन्हेगारी वृत्तीच्या तरुणांनी वाहनांची तोडफोड केली ( Vehicle Vandalism At Yerawada ) आहे. सात दुचाकी, रिक्षा आणि एका कारचे या तोडफोडीत नुकसान झाले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त होत आहे.
शहारातील येरवडा येथील गाडगीळ येथे काही गुन्हेगारी वृत्तीच्या तरुणांनी गाड्यांची तोडफोड केली. पहाटे साडेचारच्या सुमारास ही घटना घडली आहे. वाहनांची तोडफोड करणाऱ्या अज्ञात व्यक्तिंविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस गुन्हेगार तरुणांचा शोध घेत आहेत.