पुणे -शिवसेना नेते रघुनाथ कुचिकवर काही दिवसांपूर्वी एका तरुणीने बलात्काराचा आरोप केला ( Shivsena Leader Raghunath Kuchik Rape Case ) होता. त्या पीडित तरुणीने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ( Attempt To Suicide Young Woman ) आहे. मात्र, पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेने तरुणीला वाचवण्यात यश आले आहे.
जीवे मारण्याची धमकी
पुण्यातील शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर एका 24 वर्षीय तरुणीने लग्नाचे आमिष दाखवत शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप केला होता. तसेच, त्यानंतर आरोपीने बळजबरीने गर्भपात करत, हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रघुनाथ कुचिक यांच्यावर भादंवि कलम 376, 313 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.