पुणे - स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरूणीकडे पाहून अश्लील कृत्य केल्याची घटना समोर आली ( Man Wrong Things With Girl ) आहे. पुण्यातील टिळक रस्त्यावर ( Tilak Road In Pune ) हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील टिळक रोड, सदाशिव पेठ त्याचसोबत आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, विद्यार्थीनी हे स्पर्धा परीक्षेची तयार करतात. काल रविवार असल्याने गर्दी कमी होती. तेव्हा तरुणी सकाळी साडेसहाच्या सुमारास टिळक रस्त्यावरुन सकाळी जात होती. यावेळी एका अनोळखी व्यक्तीने तिचा पाठलाग केला आणि तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव केला.