पुणेसध्या तरुण तरुणांमध्ये सोशल मीडियाचा प्रचंड क्रेझ तयार झाला असून दिवसरात्र तरुण तरुणी हे सोशल मीडियाचा वापर करतात. सध्या सोशल मीडियाचा एवढा क्रेझ आहे, की सोशल मीडियावर असलेल्या वेगवेगळ्या ॲप तरुण तरुणी वापरत आहे. याचा जरी एंटरटेनमेंट म्हणून वापर होत असला तरी या सोशल मीडियावरील ॲपवरून फसवणुकीच्या अनेक घटना समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. Pune Crime अश्याच या सोशल मीडियावर डेटिंग ॲपवरून पुण्यातील राष्ट्रीय महिला खेळाडूची फसवणूक आणि अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे.
पुणे शहरात वर्षभरात सायबर पोलीस स्टेशन येथे डेटिंगवरून फसवणुकीचे गुन्हे हे 130 दाखल झाले आहे, तर सोशल मीडियावरून फसवणुकीचे गुन्हे देखील मोठ्या संख्येने दाखल झाले असून यात मेट्रोमुनीचे 69 गुन्हे, गिफ्ट कॉलचे 93 गुन्हे, इरीटेटिंग कॉलचे 391 गुन्हे दाखल आहे. Pune Crime डेटिंग ॲपवरून देखील महिला आणि पुरुष या दोघांच्या फसवणुकीचे गुन्हे हे दाखल झाले आहे. अश्या पद्धतीने सध्या सोशल मीडियावरील विविध ॲप तसेच सोशल मीडियावरून फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे.
पोलिसात यायाबत तक्रार दाखलपुण्यातील एका राष्ट्रीय महिला खेळाडूची अशीच एका डेटिंग ॲपवरून फसवणूक झाली आहे. ती म्हणते की मी एक राष्ट्रीय खेळाडू असून मी स्पर्धा परीक्षांची तयारी देखील करत आहे. मी माझ्या फोनमध्ये डेटिंग अप तींडर लोड केले. आपल्या स्वतःच्या प्रोफाईलशी एक प्रोफाइल मॅच होतेय म्हणून मी एक रिक्वेस्ट स्वीकारली. त्यानंतर आमच्यात चॅटिंग सुरू झालं. एकमेकांच्या आवडीनिवडी जाणून घेतल्या. एकमेकांना नंबर दिले, भेटीगाठी होऊ लागल्या. त्यातूनच पुढे या पीडित तरुणीला संबंधित व्यक्तीने तुला वेगवेगळी आमिष दाखवून तिच्याशी मुंबई आणि अन्य ठिकाणी मनाविरुद्ध शरीर संबंध प्रस्थापित केले. असे संबंध अनेकदा प्रस्थापित केले. Pune Police जेव्हा या पीडित तरुणीला समजले की, आपण ज्याला डेट करत आहोत. तो 50 वर्षांचा पुरुष आहे. त्याच लग्न झालं आहे. त्याला 2 मुलं आहेत. त्यानंतर लक्षात आलं की आपली फसवणूक झाली आहे. या तरुणीने डेक्कन पोलिसात यायाबत तक्रार दाखल केली असून पोलीस Pune Police तपास करत आहेत.