पुणे - पुण्यात एका तरुणाने राज्यातील 4 महिला आमदारांची ( women MLAs ) फसवणूक ( Fraud ) केली आहे. मुकेश राठोड असे फसवणूक करणार्या तरुणाचे नाव आहे. या तरुणाने 4 महिला आमदारांची आर्थिक फसवणूक केली असून त्याच्या विरोधात पुण्यातील ( Pune ) बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये ( Bibwewadi Police ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी हा अजूनही फरार असून पोलीसांचा शोध -पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप आमदार माधुरी मिसाळ, श्वेता महाले, मेघना बोर्डीकर, देवयानी फरांदे या राज्यातील 4 महिला आमदारांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आई आजारी असल्याचे सांगत मुकेश राठोड नावाच्या तरुणाने या महिला आमदारांकडे मदत मागितली होती. आमदारांनीही मदत म्हणून ती रक्कम ऑनलाइन माध्यमातून दिली. मात्र, नंतर तो कॉल फेक असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.