महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'गौतम नवलाखा देशद्रोहीच, माओवादी संघटनेसह हिजबुल मुजाहिद्दीनच्या संपर्कात होते' - गौतम नवलाखा देशद्रोहीच

गौतम नवलाखा यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेले अंतरिम संरक्षण 11 नोव्हेंबरपर्यंत आहे. तर, त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील निकाल 12 नोव्हेंबरला होईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे निकाल होईपर्यंत नवलाखा यांना अटक करू नये, असे आदेश न्यायालयाने या प्रकरणाचे तपास अधिकारी सहायक पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांना दिले आहेत.

गौतम नवलाखा

By

Published : Nov 7, 2019, 4:02 PM IST

पुणे- एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा प्रकरणातील संशयित आरोपी गौतम नवलाखा हे काश्मीरमधील हिजबुल मुजाहिद्दीन आणि माओवादी संघटनेच्या संपर्कात होते. या दोन्ही संघटनेच्या प्रमुख नेत्यांमध्ये बैठक व्हावी यासाठी ते प्रयत्न करत होते. त्यांच्या कारवाया देशद्रोही होत्या, त्यामुळे गौतम नवलाखा हे देशद्रोही असल्याचा युक्तिवाद गुरुवारी सरकारी वकील उज्वला पवार यांनी केला. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात नवलाखा यांच्या अटकपूर्व जामिनावर आज दोन्ही पक्षांचा युक्तिवाद झाला.

हेही वाचा -खेडसह ४ तालुक्यात धुक्याची चादर, पिकांना फटका बसण्याची शक्यता

हिजबुल मुजाहिद्दीनच्या संपर्कात असताना नवलाखा यांनी देशाचे किती नुकसान केले? किती विद्यार्थ्यांना त्यांनी माओवादी संघटनेत सहभागी करून घेतले? याचा तपास करायचा आहे. त्यामुळे त्यांची अटक गरजेची असल्याचे अॅड पवार यांनी न्यायालयाला सांगितले. तर, बचाव पक्षाच्या वकील रागिणी आहुजा यांनी युक्तिवाद करताना विविध पत्रांमध्ये नवलाखा यांचे नाव असले तरी त्यांचा दहशतवादी कृत्यांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचे कुठेही स्पष्ट झालेले नाही. तसेच मागील वर्षभरात त्यांना कुठल्याही चौकशीसाठी बोलवण्यात आले नाही. त्यामुळे त्यांना अटक करणे गरजेचे नसल्याचे न्यायालयाला सांगितले.

निकाल होईपर्यंत नवलाखा यांना अटक करू नये:-

गौतम नवलाखा यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेले अंतरिम संरक्षण 11 नोव्हेंबरपर्यंत आहे. तर, त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील निकाल 12 नोव्हेंबरला होईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे निकाल होईपर्यंत नवलाखा यांना अटक करू नये, असे आदेश न्यायालयाने या प्रकरणाचे तपास अधिकारी सहायक पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांना दिले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details