पुणे- राज्यासह पुणे शहरातही दिवसंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. पुणे शहरात रविवारी (दि. 9 जानेवारी) 4 हजार 29 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली ( Pune Corona Update ) आहे. कोरोनामुळे एकाला आपला जीव गमवावा लागला आहे. दिवसभरात 668 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आले आहे.
Pune Corona Update : शहरात 4 हजार 29 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, एक मृत्यू
पुणे शहरात रविवारी (दि. 9 जानेवारी) 4 हजार 29 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली ( Pune Corona Update ) आहे. कोरोनामुळे एकाला आपला जीव गमवावा लागला आहे. दिवसभरात 668 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आले आहे. कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. शहरात 14 हजार 890 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण ( Active Corona Patients in Pune City ) असून त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.
14 हजार 890 सक्रिय रुग्ण -पुणे शहरात दिवसंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. शहरात गेल्या काही महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण कमी झाले होते. दरोरोज 100 ते 150 असे रुग्ण आढळून येत होते. मात्र, वाढत जाणारी गर्दी, नागरिकांकडून होणार नियमांचे उल्लंघन यामुळे शहरात आता रुग्णसंख्या वाढायला लागली आहे. शहरात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढत आहे. एकीकडे राज्यात ओमायक्रॉनचा धोका तर दुसरीकडे दिवसंदिवस वाढत जाणाऱ्या कोरोना रुग्णामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात मागील पाच दिवसांपासून 12 हजार 79 रुग्ण आढळले आहेत. सध्या शहरात 14 हजार 890 सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients in Pune City ) असून त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.
हेही वाचा -ओबीसी समाजाला 27 टक्के आरक्षण मिळत नाही तो पर्यंत निवडणुका घेऊ नये - केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड