पुणे- राज्यासह पुणे शहरातही दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. एकीकडे राज्यात ओमायक्रॉनचे वाढत असलेले रुग्ण तर दुसरीकडे कोरोनाचेही वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाला आहे. पुणे शहरात आज 8 हजार 246 कोरोनाग्रस्त रुग्ण ( Pune Corona Update ) आढळून आले असून नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमुळे चिंतेच वातावरण निर्माण झाले आहे.
Pune Corona Update : शहरात 8 हजार 246 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, नऊ जणांचा मृत्यू - सक्रिय रुग्ण
पुणे शहरात आज दिवसभरात 8 हजार 246 कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ झाली ( Pune Corona Update ) असून नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. 7 हजार 367 रुग्णांचा डिस्चार्ज देण्यात असून शहरात सध्या 45 हजार 950 सक्रिय रुग्ण ( Active Corona Cases in Pune City ) असून त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.
शहरात 45 हजार 950- दिवसभरात पुणे शहरात 7 हजार 367 रुग्णांचा डिस्चार्ज देण्यात आले आहे. तरीही पुणे शहरात 45 हजार 950 इतके सक्रिय रुग्ण ( Active Corona Cases in Pune City ) असून त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आश्वासन करण्यात येत आहे. मात्र, वाढत जाणारी गर्दी, नागरिकांकडून होणारे नियमांचे उल्लंघन यामुळे शहरात दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढ आहे. एकीकडे ओमायक्रॉनचा धोका तर दुसरीकडे वाढत जाणारी कोरोनाग्रस्तांची संख्या यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.