महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुणे कोरोना अपडेट: दिवसभरात २८३४ पॉझिटिव्ह

पुणे शहरात शुक्रवारी १९ मार्चला दिवसभरात २८३४ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात ८०८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

By

Published : Mar 19, 2021, 8:12 PM IST

Pune Corona Update: 2834 positives in a day
पुणे कोरोना अपडेट: दिवसभरात २८३४ पॉझिटिव्ह

पुणे - पुणे शहरात शुक्रवारी १९ मार्चला दिवसभरात २८३४ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात ८०८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाबाधीत २८ रुग्णांचा मृत्यू झाला असून १३ रूग्ण पुण्याबाहेरील आहेत. तसेच ४९९ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २ लाख २९ हजार ३८३ झाली आहे. तर पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या १८ हजार ८८८ आहे. पुणे शहरातील एकूण मृत्यू ५०१७ आहेत. तसेच आजपर्यंतच एकूण २ लाख ५ हजार ४७८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात आज १२ हजार ६२५ नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली आहे. दुसरीकडे पुणे विभागाचा विचार केला तर 6 लाख 19 हजार 472 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 6 लाख 71 हजार 101 झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 34 हजार 953 इतकी आहे. एकूण 16 हजार 676 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.48 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 92.31 टक्के आहे.

पुणे जिल्हा-

पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 4 लाख 53 हजार 532 रुग्णांपैकी 4 लाख 14 हजार 86 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण 30 हजार 52 आहेत. कोरोनाबाधित एकूण 9 हजार 394 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.7 टक्के इतके आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 91.30 टक्के आहे.

सातारा जिल्हा-

सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 61 हजार 605 रुग्णांपैकी 57 हजार 679 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 2 हजार 54 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 872 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा-

सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 55 हजार 670 रुग्णांपैकी 51 हजार 812 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 1 हजार 973 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 885 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा-

सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 49 हजार 231 रुग्णांपैकी 46 हजार 960 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 500 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 771 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा-

कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 51 हजार 63 रुग्णांपैकी 48 हजार 935 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 374 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 754 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा-वीज बिल थकविल्याने पुण्यात जम्बो कोव्हिड रुग्णालयाचेच कनेक्शन कापले

ABOUT THE AUTHOR

...view details