पुणे - राज्यासह पुणे शहरातही दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. एकीकडे राज्यात ओमायक्रॉनचे वाढत असलेले रुग्ण तर, दुसरीकडे कोरोनाचे देखील वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पुणे शहरात आज 2 हजार 471 कोरोना पॉझिटिव्ह ( Pune Corona Update ) रुग्ण आढळून आले. शहरात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोना रुग्ण संख्या माहिती हेही वाचा -Pune Metro Starts Soon : पुणेकरांच्या सेवेत लवकरच धावणार मेट्रो, जलदगतीने काम सुरु
गेल्या 4 दिवसांत आढळले 8 हजार 50 रुग्ण
पुणे शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. शहरात गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचे रुग्ण कमी झाले होते. दररोज 100 ते 150 असे रुग्ण आढळून येत होते. मात्र वाढत जाणारी गर्दी, नागरिकांकडून होणारे नियमांचे उल्लंघन यामुळे शहरात आत्ता रुग्णसंख्या वाढायला लागली आहे. शहरात गेल्या चार दिवसांत 8 हजार 50 रुग्ण आढळून आले. आज अखेरीस शहरात 11 हजार 550 एवढे अॅक्टिव्ह रुग्ण झाले आहे.
शहरात आज 2 हजार 451 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
पुणे शहरात आज 2 हजार 471 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. तर, दिवसभरात 711 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले. शहरात आज कोरोनाने 2 मृत्यू झाले आहेत. शहरातील अॅक्टिव्ह रुग्ण संख्या ही 11 हजार 550 एवढी झाली आहे.
हेही वाचा -Kalicharan Maharaj Bail : अखेर कालीचरण महाराजांना जामीन मंजूर पण, 'या' प्रकरणात..