पुणे- कोरोना महामारीच्या संकटात केंद्र सरकारकडून सातत्याने पेट्रोल, डिझेलची दरवाढ केली जात आहे. या दरवाढीविरोधात आज राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृवाखाली पुण्यात अलका चौकात पुणे शहर काँग्रेसच्यावतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पुणे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, उल्हास पवार आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात पुणे काँग्रेसचे धरणे आंदोलन
आज देशात कोरोनाचे संकट असताना सर्वच क्षेत्रातील नागरिक मोठ्या अडचणीतून जात आहे. अशा वेळेस केंद्र सरकार गेल्या 25 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ करत असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
आज देशात कोरोनाचे संकट असताना सर्वच क्षेत्रातील नागरिक मोठ्या अडचणीतून जात आहे. अशा वेळेस केंद्र सरकार गेल्या 25 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ करत आहे. पेट्रोल आणि डिझेलची किंमत सारखी झाली आहे. डॉ मनमोहन सिंग जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा बॅरलची किंमत 135 डॉलर होती. आज ती 16 पर्यंत खाली आली असताना दरवाढ वाढतच चालली आहे. केंद्र सरकार दरवाढ करून सर्वसामान्यांच्या खिशांवर डल्ला मारत आहे, अशी टीका महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. यावेळी केंद्र सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या.