पुणे - शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून पुण्यातील ध्रुवी गणेश पडवळ 9 वर्षे व संस्कार खटावकर 8 वर्षे या चिमुकल्यानी लोणावळा येथील तैलबैला गिरिदुर्ग सर केला आहे. त्यांनी शिव गारद देऊन हा दिवस साजरा केला. ( children gone on tailbaila fort ) ( shivrajyabhishek sohala 2022 )
संस्कार हृषिकेश खटावकर 6 जून शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून पुण्यातील ध्रुवी गणेश पडवळ (9 वर्षे ) व संस्कार खटावकर (8 वर्षे ) या चिमुकल्यानी लोणावळा येथील तैलबैला गिरिदुर्ग सर करून शिव गारद देऊन हा दिवस साजरा केला. पुणे येथील लहू उघडे यांच्या मार्गदर्शनाखाली तैलबैला ही मोहीम यशस्वी रित्या पार पडली.
हेही वाचा - चलनी नोटांवर दिसू शकतात टागोर अन् कलाम यांची छायाचित्रे - अहवाल
पुणे येथील एस. एल. ऍडव्हेंचर लहू उघडे यांच्या मार्गदर्शनाखाली तैलबैला ही मोहीम यशस्वी रित्या पार केली आहे. ध्रुवी पडवळ हिने अनेक वेगवेगळ्या सुळक्यांवर यशस्वीरित्या चढाई केली आहे. तसेच तिला स्पोर्ट क्लाइम्बिंग या खेळात राष्ट्रीय स्पर्धेत 2 सुवर्ण पदके देखील मिळाली आहेत.
ध्रुवी पडवळ हिने अनेक वेगवेगळ्या सुळक्यांवर यशस्वी रित्या चढाई केली आहे तसेच तिला स्पोर्ट कलाइम्बिंग या खेळात राष्ट्रीय स्पर्धेत 2 सुवर्ण पदके मिळवली आहेत. तर संस्कार हृषिकेश खटावकर सध्या मॉडर्न प्रायमरी स्कूल 3 री ला शिकत आहे. तसेच त्याचा वेगवेगळी स्तोत्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे बोलण्यात हातखंडा आहे. दोघेही मागील 3 वर्षा पासून वॉल क्लाइम्बिंगचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण राजे शिवाजी कलाइम्बिंग वॉल शिवाजी नगर पुणे येथे अमोल जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली घेत आहेत.
हेही वाचा -Monsoon In Vidarbha : विदर्भात पावसाचे आगमन लांबणीवर; पुढील दोन दिवस Heat Wave चा हवामान विभागाचा इशारा