पुणे :चांदणी चौकातील ( Chandani Chowk ) जुना पूल पाडण्याबाबत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणतर्फे ( National Highways Authority of India ) नियोजन करण्यात येत असून त्यासाठीची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आहे. आज रात्री ११ वाजेपासून उद्या सकाळी ८ वाजेपर्यंत वाहतूक बंद करुन २ ऑक्टोबर रोजी पहाटे २ वाजता ब्लास्ट ( Chandani Chowk Bridge Demolition ) करण्यात येईल असे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात ( Bridge Demolition In Pune ) आले आहे. मुंबई-बंगळुरू महामार्गावरील सद्यस्थितीतील चौपदरी रस्त्याचे सहापदरीकरण करण्यासाठीचे रिटेनिंग वॉलचे व माती भरावाचे काम सुरू आहे. श्रृंगेरी मठाच्या समोरील सेवा रस्त्याचे कामदेखील करण्यात येत आहे. बावधनकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या रॅम्प क्र. ६ च्या खडकामध्ये ब्लास्टींगद्वारे खोदकामही सुरू आहे.
पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यावरुन वाहतूक वळवावी लागणार : एनडीए ते मुंबई या रॅम्प क्र. ५ चे काम प्रगतीपथावर आहे. दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रोडसाठी रॉक ब्लास्टींगचे काम करण्यात येत आहे. अवजड वाहने शहराच्या बाहेर दोन्ही बाजूस ( मुंबई बाजू व सातारा बाजू ) थांबवावी लागणार आहेत. त्यासाठी टोल नाक्यावर व इतर ठिकाणी सूचना फलक लावण्याचे काम सुरू आहे. इतर वाहनांसाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यावरुन वाहतूक वळवावी लागणार आहे. त्यासाठी दिशा दर्शक फलक बसविण्याचे कार्यवाहीदेखील सुरू आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, ठाणे रायगड या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पोलीस अधिक्षक यांना नियोजित पुल पाडण्याच्या वेळेत वाहतूक नियोजनाबाबत अवगत करण्यात आले आहे.