पुणे - घरकोंबड्या ठाकरे सरकारच्या निषेधार्थ आज पुणे शहर भाजप महिला आघाडीच्यावतीने भवानी पेठेमध्ये गणरायाच्या चरणी साकडे आंदोलन करण्यात आले. या सरकारला सदबुद्धी मिळो व महिलांवर होणाऱ्या अत्याचार विरोधात संघर्ष करण्याची व लढा देण्याची ताकत मिळो ही प्रार्थना गणरायाच्या चरणी भाजप महिला आघाडीच्यावतीने करण्यात आले.
भाजप महिला आघाडीचे आंदोलन हेही वाचा -CORONA VIRUS : राज्यात शनिवारी ३,०७५ नवे रुग्ण, रिकव्हरी रेट 97.05 टक्क्यांवर
भाजप महिला प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व भाजप महिला आघाडी पुणे शहर अध्यक्षा अर्चना तुषार पाटील यांच्यावतीने आंदोलन करण्यात आले.
ठाकरे सरकार हे अत्यंत निष्क्रिय - उमा खापरे
उमा खापरे म्हणाल्या गेले काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणारे अत्याचार, विनयभंग, छेडछाड, बलात्कारचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र स्पष्ट आहे. तरीदेखील त्यावर ठाकरे सरकार तसेच प्रशासनाकडून कोणतेही ठोस निर्णय घेताना दिसत नाही. कारण सध्या असलेले महाराष्ट्रतील ठाकरे सरकार हे अत्यंत निष्क्रिय असून महिलांच्या बाबतीत बेजबाबदार आहे. महाराष्ट्रात महिलांवर होत असलेले अत्याचार थांबले पाहिजेत, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घराबाहेर पडून महाराष्ट्रातील महिलांच्या व्यथा समजून घ्याव्यात व कायद्यांची अंमलबजावणी प्रभावी करावी, अशी मागणी खापरे यांनी केली आहे.
महिलांवर होणारे अत्याचार हे तिघाडी सरकार नुसतं बघतंय - अर्चना पाटील
महिलांच्या सुरक्षेच्या व स्वरक्षणाकरिता असलेल्या शक्ती कायद्याची अंमलबजावणी का होत नाही? त्याचप्रमाणे महिला आयोगाला अध्यक्ष का मिळत नाही? याबाबत या माध्यमातून सरकारला विचारणा केली असल्याचे अर्चना तुषार पाटील यांनी सांगितले. महिलांवर होणारे अत्याचार हे तिघाडी सरकार नुसते बघत आहे. पोलीस प्रशासनही राजकीय दबावाला बळी पडत आहे. यामुळे महिलांना न्याय मिळत नाही. आता तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जागे व्हा आणि महाराष्ट्रातील महिलांच्या व्यथा जाणून घ्या, अशी प्रतिक्रिया अर्चना तुषार पाटील यांनी दिली आहे.
यावेळी भाजप प्रदेशाध्यक्षा उमा खापरे, पुणे शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा अर्चना पाटील, अश्विनी पवार, रेश्मा सय्यद, गायत्री भागवत, रेखा चोंदे, कांचन कुंबरे, विजया भोसले, माधुरी गिरमकर, परवीन तांबोळी तसेच महिला आघाडीच्या सदस्या आणि पदाधिकारी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आयोजन नगरसेविका अर्चना पाटील यांनी केले होते.
हेही वाचा -गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा राजीनामा; मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत 'ही' आहेत नावे