पुणे -राहुल गांधी यांनी वीर सावरकरांबाबतीत केलेल्या विधानाचा पुणे भाजपच्यावतीने निषेध करण्यात आला. यावेळी कसबा मतदारसंघाच्यावतीने अभिनव चौकात मूक आंदोलन करण्यात आले. तसेच शहर भाजपच्या वतीने राहुल गांधींच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. शहरातील सावरकर स्मारकासमोर ही निदर्शने केली गेली. यावेळी भाजप शहराध्यक्षा आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
पोस्टर्सच्या माध्यमातून पुणे भाजपकडून राहूल गांधींच्या वक्तव्याचा निषेध हेही वाचा... हिवाळी अधिवेशनात विरोधक सरकारला कोंडीत पकडणार
होय, मी पण सावरकर...
निदर्शकांनी यावेळी राहुल गांधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राहुल गांधींना सावरकरांच्या नखाची सर नाही. राहुल गांधी यांचा कोणतेही विचार, ज्ञान आणि अभ्यास नाही. त्यामुळे सावरकरांवर बोलणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे असल्याचा आरोप माधुरी मिसाळ यांनी केला आहे. यावेळी आंदोलकांनी 'होय, मी पण सावरकर' अशी पोस्टर्स हातात घेतली होती.
हेही वाचा... अजित पवारांची क्रिकेटच्या मैदानातही दादागिरी...