पुणे -राजमाता जिजाऊ गर्जना, लाठी-काठी, दांडपट्टा, तलवारबाजी हे चित्तथरारक साहसी खेळ आणि मार्शल आर्ट प्रात्यक्षिकाने उपस्थितांच्या अंगावर शहारे उभे राहिले. निमित्त होते भैरवी सोशल फाउंडेशन आणि मोरया नर्सिंग होमच्या वतीने महिला दिनानिमित्त आयोजित 'जागर 2022'मध्ये विविध क्षेत्रातील महिलांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी वय वर्ष 4 ते 86 वयोगटातील राज्यातील निवडक 16 महिलांचा 'भैरवी महिला समाजरत्न पुरस्कार' देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, मोरया नर्सिंग होमच्या अध्यक्षा डॉ. सुचेता भालेराव, डॉ. सचिन भालेराव, आमदार नीलेश लंके यांच्या मातोश्री शकुंतला लंके, शशिकला कुंभार, नेहा कदम, मनीषा कदम, डॉ. सुनील जगताप, डॉ. नीलेश जगताप, डॉ. सुनील इंगळे, राजू शेळके, डॉ. शाल्मली खुणे, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्यासह 'सरसेनापती हंबीरराव' चित्रपटाची टीम आदी उपस्थित होते.