महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सुरू होऊन महिना झाला, तरी चित्रपटगृहे ओसच - pune news today

नोव्हेंबरमध्ये पुण्यात चित्रपटगृहे सुरू झाली असली, तरी केवळ मल्टिप्लेक्स सुरू झाली तर पुण्यातील एक पडदा सिनेमगृह मालकांनी सिनेमागृह सुरू न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र गेल्या महिन्याभरातील शहरातील चित्रपटगृहांची स्थिती पहिली तर प्रेक्षकांनी सिनेमगृहाकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

theaters
theaters

By

Published : Dec 15, 2020, 2:45 PM IST

Updated : Dec 15, 2020, 6:05 PM IST

पुणे - कोरोना संसर्गामुळे मार्च महिन्यापासून राज्यभरातली सिनेमागृहे बंद होती. मात्र अनलॉकप्रक्रियेत नोव्हेंबर महिन्यात राज्यात सिनेमागृहे सुरू करायला परवानगी मिळाली. पुण्यातील मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये सिनेमा दाखवण्यास सुरुवातही झाली. मात्र गेल्या महिन्याभरातील शहरातील चित्रपटगृहांची स्थिती पहिली तर प्रेक्षकांनी सिनेमगृहाकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. मुळात नोव्हेंबरमध्ये पुण्यात चित्रपटगृहे सुरू झाली असली, तरी केवळ मल्टिप्लेक्स सुरू झाली तर पुण्यातील एक पडदा सिनेमगृह मालकांनी सिनेमागृह सुरू न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे हे एकपडदा सिनेमगृहे अजूनही बंदच आहेत.

नवीन चित्रपट नाहीत

राज्य सरकारने परवानगी देताना अटी घालून दिल्या होत्या. त्यानुसार 50% आसनक्षमतेसह आणि कोणतेही खाद्यपदार्थ आत न नेण्याच्या अटीवर ही सिनेमागृहे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, एक पडदा सिनेमागृह मालकांच्या समस्या जास्त आहेत. एकीकडे सिनेमागृहे सुरू झाल्यापासून केवळ 'सूरज पे मंगल भारी' आणि 'द लव इनफ? सर' हे दोन चित्रपटच रिलीज झाले आहेत. नवीन चित्रपट रिलीज झालेले नाहीत, त्यामुळे नियमांचे काटेकोरपणे पालन करत प्रेक्षकांना प्रवेश देणे प्रेक्षकांसोबतच कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेविषयी योग्य ती काळजी घेणे याबाबी मल्टिप्लेक्समध्ये करायला सुरुवात झाली होती, पण प्रेक्षकच नसल्याने मल्टिप्लेक्सही बंदच असल्यासारखी परिस्थिती आहे.

कोरोना संसर्गाचा वेग मंदावला असला तरी धोका कमी नाही

पुण्यामध्ये एक पडदा चित्रपटगृह बंद आहेत. मल्टिप्लेक्स सुरू केलीत, मात्र प्रेक्षकांअभावी ती सुद्धा ओस पडल्याचे चित्र आहे. नविन चित्रपट रिलीज होत नसल्याने प्रेक्षक तरी कुठल्या आकर्षणापोटी चित्रपटगृहात येतील हा प्रश्नच आहे, त्यात कोरोना संसर्गाचा वेग मंदावला असला तरी धोका आणि भीती कमी झालेली नाही. त्यामुळे अनेक प्रेक्षक हे मोबाइलवरच चित्रपट पाहणे मनोरंजन करणे पसंत करतात. एकंदरीतच पुण्यामध्ये चित्रपटगृहांसमोरील संकट अजूनही टळले नसल्याचे चित्र आहे.

Last Updated : Dec 15, 2020, 6:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details