पुणे यंदाचा दसरा मेळावा कुणाचा होणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागले होते. मुंबई महापालिकेने कोणताही गटाला परवानगी न देण्याचा निर्णय दिल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने ( Mumbai High Court ) शिंदे गटाला दणका दिला. शिंदे गटाची हस्तक्षेप याचिका फेटाळली तर शिवसेना ठाकरे गटाला दसरा मेळावा साजरा करण्याकरिता परवानगी मिळाली आहे. यावर विरोधी पक्ष नेते अजित पवार ( Opposition leader Ajit Pawar ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
न्यायालयाचे आभार मानतो ते म्हणाले आपल्या इथं एक पद्धत आहे, की आपल्याला न्याय नाही मिळाला, की आपण न्याय व्यवस्थेकडे जातो. मग न्याय व्यवस्था न्याय देते. आज न्यायालयात शिवसेनेला न्याय मिळालं असल्याने मी समाधान व्यक्त करतो. हा न्याय निरपेक्ष पद्धतीने मिळालेला आहे. आणि आत्ता शिवसैनिकांच्या मनातदेखील एक उत्साह संचारलं असेल.आत्ता ज्यांना एकनाथ शिंदे यांचे विचार एकायचे असेल, त्यांनी बीकेसीला जायला हवे. ज्यांना उद्धव ठाकरे यांचे विचार एकायचे असेल त्यांनी शिवतीर्थावर जावे व तसेच शिवसेनेला परवानगी दिल्यामुळे न्यायालयाचे आभार मानतो, असे यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले आहेत.
श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीवर बसलेमहाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुणे शहरातील कसबा, शिवाजीनगर मतदारसंघातील पदाधिकऱ्यांची आढावा बैठक आज केसरी वाडा येथे संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीवर बसले होते. यावर पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की मुख्यमंत्र्यांचं घर हे त्यांचं घर आहे. मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर फक्त मुख्यमंत्री बसतात. कोणाच्या घरी कोणत्या खुर्च्या ठेवल्या आहे. त्याच्यावर कोण बसू शकतो. हा त्यांच्या घरातील अंतर्गत प्रश्न आहे. माझं म्हणणं आहे, की या प्रश्नपेक्षा बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई महत्त्वाचं आहे, असे देखील यावेळी पवार म्हणाले.