महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 22, 2021, 10:38 AM IST

ETV Bharat / city

पुणे विमानतळ बनले लस वाहतुकीचे ‘हब’, हवाई मार्गाने देशभरात 56 कोटी कोरोना लसीचे वितरण, तर परदेशात 2 लाख डोस वितरित

केंद्र सरकारने प्रवासी विमानातून लस वाहतुकीला परवानगी दिल्याने पुणे विमानतळ लस वाहतुकीचे ‘हब’ बनले आहे. पुण्यातून विमानाने दिल्ली, चेन्नई, बेंगलुरू, हैद्राबाद, कोलकाता यासह उत्तर अमेरिकेत असलेल्या सुरीनाम सेंट किट्स, सेंट व्हिन्सेंट गेर्नाडाइन्स, अँटिग्या, बारबुडा, सेंट लुसिया या देशांना पुण्यातून 56 कोटी कोव्हिशिल्ड लसीचे डोस पुरवण्यात आले आहेत.

Pune airport becomes hub of Covid vaccine supply
पुणे विमानतळ बनले लस वाहतुकीचे ‘हब’, हवाई मार्गाने देशभरात 56 कोटी कोरोना लसीचे वितरण, तर परदेशात 2 लाख डोस वितरित

पुणे - पुण्यातील सिरम इन्स्टिट्युटमधून देशभरात लस वितरण करण्यात येत आहे. केंद्र सरकारने प्रवासी विमानातून लस वाहतुकीला परवानगी दिल्याने पुणे विमानतळ लस वाहतुकीचे ‘हब’ बनले आहे. पुण्यातून विमानाने दिल्ली, चेन्नई, बेंगलुरू, हैद्राबाद, कोलकाता यासह उत्तर अमेरिकेत असलेल्या सुरीनाम सेंट किट्स, सेंट व्हिन्सेंट गेर्नाडाइन्स, अँटिग्या, बारबुडा, सेंट लुसिया या देशांना पुण्यातून 56 कोटी कोव्हिशिल्ड लसीचे डोस पुरवण्यात आले आहेत.

सिरम कोविशिल्ड देशभरात -

केंद्र सरकारने कोविशिल्ड लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिल्यापासून कोविशिल्ड लसीचे उत्पादन पुण्यातील सिरम इन्स्टिट्युटमध्ये केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 नोव्हेंबर 2020 रोजी पुण्यात सीरम इन्स्टिट्यूट येथे येऊन कोव्हिशिल्ड लस उत्पादनाची पहाणी केली. त्यानंतर लगेचच जानेवारी 2021 मध्ये कोरोना प्रतिबंधक असलेल्या कोव्हिशिल्ड लशीचे वाटप वर्षभरात काही ठिकाणी रस्ते वाहतुकीद्वारा झाले. तर काही ठिकाणी पुण्यातील लोहगाव विमानतळावरून करण्यात आले. याकरिता विमानतळ प्रशासनाने कोरोनाकाळात सर्व बंद असताना सुद्धा एक वेगळी यंत्रणा उभारून कोव्हिशिल्ड लसीची वाहतूक सुरू ठेवली. परिणामी, देशातील बहुतांश नागरिकांना तत्काळ लसीचे डोस मिळाल्यामुळे कोरोनाचा वाढत चाललेला कहर शासनाला काही प्रमाणात रोखता आला.

परदेशात 7 देशांना कोव्हिशिल्डचा पुरवठा -

पुणे विमानतळावरून आतापर्यंत देशभरात कोरोना लशीचा पुरवठा करण्यात आला आहे. परंतु त्याच बरोबर उत्तर अमेरिकेत असलेल्या सुरीनाम सेंट किट्स, सेंट व्हिन्सेंट गेर्नाडाइन्स, अँटिग्या, बारबुडा, सेंट लुसिया परदेशात 7 देशांना कोव्हिशिल्डचे 2 लाख डोस रवाना करण्यात आले आहेत.

आतापर्यंत देशविदेशात लसीचा झालेला पुरवठा -

देशभरात 57 कोटी 40 लाख 97 हजार 100 डोस
परदेशात 2 लाख 16 हजार डोस

लसीचा प्रवास कसा होतो -

लस उत्पादक सिरम इन्स्टिट्यूट विमानतळ - शासकीय लस साठवणूक केंद्र - शीत व्हॅन - जिल्हा लस केंद्र - शीत व्हॅन - प्राथमिक आरोग्य केंद्र - उपकेंद्र - प्रत्यक्ष लसीकरण

ABOUT THE AUTHOR

...view details