पुणे - मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढलेले पाहायला मिळत आहे. मागील आठ दिवसांचा विचार केला तर कोरोना रुग्णांची संख्या देखील झपाट्याने वाढताना पाहायला मिळत आहे. पुण्यातही रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणत वाढताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी अगदी शंभरीत असलेला रुग्णांचा आकडा काल ४००० च्या वर गेला आणि ही आकडेवारी खरच धक्कादायक आहे. अशातच एका सर्वेक्षणानुसार पुण्यात तब्बल 29 टक्के नागरिक विना मास्क फिरत असल्याचे समोर आले आहे. तर देशात मास्क वापरणाऱ्यांच्या यादीत पुणे 10 क्रमांकावर असल्याचे पुढे आले आहे.
- मास्क वापरण्यात पुणे १० व्या स्थानी
पुण्यात देखील प्रशासनाने कडक पावले उचलायला सुरुवात केली आहे. पण याउलट पुणेकर मात्र कोरोनाचे नियम पायदळी तुडवताना दिसत आहेत. कारण एका अहवालात मास्क घालण्यात पुणे १० व्या स्थानी असल्याचे सामोर आल आहे. डिजिटल इंडिया फाउंडेशनच्या अहवालानुसार पुणेकर मास्क वापरण्यात देशाच्या १० व्या स्थानी असल्याचे स्पष्ट झाले आहे. अहवालातून जी टक्केवारी सामोर आली आहे, ती देखील धक्कादायक आहे. पुण्यात तब्बल 29 टक्के नागरिक अजूनही मास्क न लावता फिरतात. पुण्यात 34 टक्के पुरुष मास्क परिधान करतात तर त्या मागोमाग 33 टक्के महिला कोविडच्या बचावासाठी मास्क लावतात, हे या अहवालातून समोर आले आहे.
- पुणेकरांनी भरला २६ कोटींचा दंड