पुणे - सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी तेजस मोरे विरोधात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचा कार्यालयात स्टिंग ऑपरेशनचा पेन ड्राईव्ह फडणवीस यांनी विधानसभेमध्ये दिला होता. ( Praveen Chavan's complaint against Tejas More) यावर तेजस मोरे यानेच माझ्या कार्यालयात घड्याळ बसवून स्टिंग ऑपप्रेशन केल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे. तेजस मोरे विरोधात काल शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
स्टिंग ऑपरेशनमध्ये भाजप नेत्यांना अडकवण्याचा प्रयत्न
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात गेल्या आठवड्यात स्टिंग ऑपरेशनचे एक पेनड्राईव्ह सादर केले होते.
फडणवीसांनी त्या स्टिंग ऑपरेशनमध्ये भाजप नेत्यांना अडकवण्यासाठी कशाप्रकारे कट रचला जात आहे, याचा पुरावा असल्याचा दावा केला होता. संबंधित स्टिंग ऑपरेशन हे सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयातील आहे.