पुणे - श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्राणप्रतिष्ठापना मिरवणुकीला उत्साहात सुरुवात झाली आहे. पारंपरिक वाद्यांच्या गजरात ही मिरवणूक सुरू झाली आहे. बाप्पाची मिरवणूक सकाळी साडेआठ वाजता मुख्य मंदिरातून सुरू झाली आहे. आप्पा बळवंत चौक, बाजीराव रस्ता या मार्गे बाप्पाची मिरवणूक उत्सव मंडपाकडे रवाना झाली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
भक्तिमय वातावरणात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे आगमन; पाहा व्हिडीओ
पुण्यातील मानाच्या आणि महत्वाच्या दगडूशेठ हलवाई गणपतीची आगमन मिरवणूक सुरू झाली आहे. मिरवणुकीसाठी मंडळाने विशेष शेष आत्मज तयार केला केला आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्राणप्रतिष्ठापना दुपारी साडेबारा वाजता केली जाणार आहे.
ढोल-ताशांचा लयबद्ध निनाद बँड पथकांचे सुरेल वादन अशा मनमोहक वातावरणात शेष आत्मज रथावर दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. या प्राणप्रतिष्ठापना मिरवणुकीसाठी मंडळाने विशेष शेष आत्मज तयार केला केला आहे. ज्यावर हजारो फुलांची मनमोहक आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती. बैलजोडीला जुंपलेला हा रथ मुख्य मंदिरातून वाजत-गाजत बाप्पाला घेऊन उत्सव मंडपाकडे दाखल झाला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना दुपारी साडेबारा वाजता सद्गुरु जंगली महाराज यांच्या हस्ते केली जाणार आहे. या प्राणप्रतिष्ठापना मिरवणुकीचा आढावा घेतलाय आमचे पुण्याचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी.