पुणे-एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची ( MPSC Exam update ) बातमी आहे. एमपीएससी परीक्षेचे प्रवेश प्रमाण पत्र डाऊनलोड करताना 63 उमेदवारांना एकाच वेळी दोन वेगवेगळ्या उपकेंद्रांची प्रवेश प्रमाण पत्र झळकली. त्यामुळे सर्व विद्यार्थी गोंधळले आहेत. याबाबत एमपीएससी सहाय्यक सचिव माहिती आणि तंत्रज्ञान यांनी अधिकृतपणे ट्वीटवर माहिती दिली.
एमपीएससी सहाय्यक सचिव माहिती आणि तंत्रज्ञान यांनी एमपीएससी परीक्षेबाबत ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की, 9 जुलै रोजी एमपीएससी ( MPSC Exam Result ) परीक्षेचे प्रवेश प्रमाण पत्र डॉऊनलोड करताना 63 उमेदवारांना एकाच वेळी दोन वेगवेगळ्या उपकेंद्रांची प्रवेश प्रमाण पत्र ( MPSC Hall ticket issue ) झळकली. या प्रकारामुळे एमपीएससी कडून 17 जुलै रोजीची प्रवेश प्रमाण पत्र प्रसिद्ध करण्याची कार्यवाही तात्पुरता स्थगित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सांगलीचा प्रमोद चौगुले राज्यात प्रथम- राज्या सेवा परीक्षेचा २९ एप्रिल रोजी निकाल लागला होता. यात 612 गुण मिळवून प्रमोद बाळासाहेब चौगुले ( Sangli Pramod Chowgule came first in MPSC Result ) हा परीक्षेत प्रथम आला. राज्य सेवा ( MPSC Result News ) परीक्षेच्या परीक्षार्थींच्या मुलाखतीचा कार्यक्रम 29 एप्रिल सहाच्या सुमारास संपला आणि त्यानंतर अवघ्या दीड तासांत या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. राज्य लोकसेवा आयोगाकडून अशा प्रमुख परीक्षेचा निकाल मुलाखतीनंतर इतक्या तत्परतेने आणि काही तासांत लागण्याचा हा पहिलाच प्रसंग ठरला आहे. एका अर्थाने ( Maharashtra MPSC News ) राज्य लोकसेवा आयोगाने हा विक्रम केला आहे.