महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Private Buses : स्वारगेट आगारातून खासगी बसेसच्या वाहतुकीला बंदी, खासगी बस संघटनेत नाराजीचा सूर - राज्य परिवहन महामंडळ

विलीनीकरणासह विविध मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचारी संपावर आहेत. संपावेळी प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून बसस्थानकातून प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी खासगी बसेसला देण्यात आली ( Private Buses ) होती. आता खासगी बसेसला स्वारगेट बसस्थानकातून खासगी बसेसच्या प्रवासी वाहतुकीस बंदी करण्याचे आदेश राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे.

छायाचित्र
छायाचित्र

By

Published : Jan 12, 2022, 6:16 PM IST

Updated : Jan 12, 2022, 7:17 PM IST

पुणे - राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून एस.टी. कर्मचाऱ्यांचा विलीनीकराणसह विविध मागण्यासाठी संप सुरू आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. यावर पर्याय म्हणून खुद्द राज्य सरकारने खासगी बसेसना ( Private Buses ) बसस्थानकातून प्रवासी वाहतूक सुरू करण्यास परवानगी दिली होती. मात्र, आता स्वारगेट बसस्थानकात खासगी बसेसला प्रवेश बंदी करण्याचे आदेश राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी ( MSRTC ) दिले आहे.

आढावा घेताना प्रतिनिधी

खासगी बस संघटना नाराज - महामंडळाच्या अशा निर्णयामुळे खासगी बस संघटना नाराज असून केवळ गरजेच्यावेळी महामंडळाकडून आमचा वापर करण्यात आला, अशी प्रतिक्रिया खासगी बस संघटनेकडून देण्यात आली. संघटनेचे पदाधिकारी म्हणाले, बसस्थानकात खासगी प्रवासी वाहतूक सुरू करण्यापूर्वी परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. त्यावेळी ज्या दिवशी एसटी पूर्ववत होईल त्या दिवशी आम्ही बसस्थानकातून प्रवासी वाहतूक करणार नाही, असे सांगितले होते. मात्र, आमच्याशी चर्चा न करता अशा प्रकारे बंदी घालणे चुकीचे आहे.

पुन्हा खासगी बसेस सुरू करण्याबाबत चर्चा -खासगी बसेस संघटनेच्या पदाधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार अधिकाऱ्यांनी बसस्थानकातून पुन्हा खासगी प्रवासी बस वाहतूक सुरू करण्याबाबत परिवहन अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मात्र, याबाबत संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेऊ, असे पदाधिकाऱ्यांने सांगितले.

हेही वाचा -Sunil Mehta Passes Away : मेहता पब्लिशिंग कंपनीचे संचालक सुनील मेहता यांचे निधन

Last Updated : Jan 12, 2022, 7:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details