पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यातील खासगी टूर्स अँड ट्रव्हर्ल्स वाल्यांचा किमान दीड हजार कोटींचा व्यवसाय बुडाला आहे. म्हणूनच सरकारने सर्व खासगी बसेसचा परमिट टॅक्स माफ करण्यासोबतच सर्व ट्रान्सपोर्टवाल्यांना आर्थिक पँकेज देण्याचीही मागणी या व्यवसायिकांनी केली आहे. आपल्या मागण्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे सर्व व्यावसायिक राज्यभरातील आरटीओ कार्यालयांसमोर बसेस जमा करण्याचे प्रातिनिधीक आंदोलन करणार आहेत.
टॅक्स माफ करा अन्यथा आरटीओमध्ये गाड्या जमा करू, खासगी बस व्यावसायिकांचा इशारा - लॉकडाऊनचा खासगी बस व्यवसायीकांना फटका
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यातील खासगी टूर्स अँड ट्रव्हर्ल्स वाल्यांचा किमान दीड हजार कोटींचा व्यवसाय बुडाला आहे. म्हणूनच सरकारने सर्व खासगी बसेसचा परमिट टॅक्स माफ करण्यासोबतच सर्व ट्रान्सपोर्टवाल्यांना आर्थिक पँकेज देण्याचीही मागणी या व्यवसायिकांनी केली आहे.
टॅक्स माफ करा अन्यथा आरटीओमध्ये गाड्या जमा करू, खासगी बस व्यावसायिकांचा इशारा
25 जून ला राज्यभरात हे आंदोलन केले जाणार असून, यामध्ये त्या-त्या ठिकाणच्या आरटीओ कार्यलयात वाहने जमा केली जाणार आहेत. यावरही सरकारने लक्ष दिले नाही तर हा व्यवसाय बंद करण्याशिवाय आमच्यासमोर पर्याय नसेल, असे असोसिएशनचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत यावर अवलंबून असलेले अनेकजण उघड्यावर येतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. इतर काही राज्यांनी खासगी बस व्यावसायिकांना दिलासा दिला आहे. मात्र, महाराष्ट्रात अद्याप याबाबत कुठलेही समाधान काढण्यात आले नाही असे या व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
Last Updated : Jun 22, 2020, 5:59 PM IST