महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुण्यातील येरवडा कारागृहात कैद्याची गळफास घेत आत्महत्या - पुणे येरवडा जेल बातमी

गणेश जगन्नाथ तांबेला येरवडा येथील खुल्या कारागृहात आणण्यात आले होते. त्याला कारागृहातील स्वयंपाकगृहात काम देण्यात आले होते. गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास त्याने कारागृहातील बरॅक क्रमांक दोनमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकल नाही.

prisoner commits suicide by hanging in yerawada jail in pune
पुण्यातील येरवडा कारागृहात कैद्याची गळफास घेत आत्महत्या

By

Published : Mar 27, 2022, 1:45 PM IST

पुणे - येरवडा कारागृह येथे एका गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. गणेश जगन्नाथ तांबे (वय 53) असे आत्महत्या केलेल्या कैद्याचे नाव आहे.

काय आहे प्रकरण - 2010 साली विरार येथील खूनप्रकरणात तांबे याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. तेव्हापासून तो ठाणे मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. तर, मे 2019 पासून तांबे याला येरवडा येथील खुल्या कारागृहात आणण्यात आले होते. याला कारागृहातील स्वयंपाकगृहात काम देण्यात आले होते. गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास त्याने कारागृहातील बरॅक क्रमांक दोनमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकल नाही. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details